महसूलमंत्र्यांचे शहर बनणार संपूर्ण सोलर सिटी

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 11 नोव्हेंबर 2020 :- घरामध्ये दररोजची वीज वापराची गरज पूर्ण करण्याकरिता सोलर पॅनल्सद्वारे सौर उर्जेचा वापर करण्याचा ‘इको फ्रेंडली’ पर्याय आता लोकप्रिय होऊ लागला आहे.

सौर उर्जेचा वापर करून घेण्याचे फायदे जसजसे लोकांच्या लक्षात येत आहेत, तसतसे सौर उर्जेचा वापर जास्तीत जास्त करून घेण्याकडे लोकांचा कल वाढताना दिसत आहे.

असाच काहीसा प्रयोग संगमनेर शहरात होत आहे. जिल्ह्यात आर्थिकदृष्ट्या संपन्न व प्रगतशील असणार्‍या संगमनेर शहरात ना. बाळासाहेब थोरात व आ. डॉ.सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली

नगरपालिकेच्यावतीने मोकळ्या जागेत सौर पॅनल बसविण्यात येणार असून घरगुती सौर पॅनल वापरासाठी नागरिकांना प्रोत्साहित करून संपूर्ण शहर सोलर सिटी बनविण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्षा सौ. दुर्गाताई तांबे यांनी दिली. शहरातील सर्व नागरिकांना आवाहन आहे,

त्यांनी आपल्या घरावर कमी खर्चामध्ये सौर पॅनल उभा करून सौर उर्जेची निर्मिती करावी. यामुळे मोठी उर्जा बचत होणार आहे. तसेच प्रदूषण विरहित अपारंपरिक उर्जेला प्रोत्साहन मिळणार आहे. भारतात मुबलक सूर्यप्रकाश असून याचा घरगुती उर्जा निर्मितीसाठी वापर केला जाणार आहे.

ही अभिनव संकल्पना शहरात राबविण्यात येणार असून यासाठी नागरिकांना प्रोत्साहन व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या सौर पॅनलसाठी घरगुती ग्राहकांना साधारण 25 हजार रुपये खर्च येणार असून यासाठी मर्चंट बँक नागरिकांना अर्थसहाय्य करणार आहे.

या माध्यमातून त्यांची कायमची उर्जा समस्या सुटणार आहे. या अभियानात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24