अहमदनगर जिल्ह्यातील ह्या शेतक-याने मुख्यमंत्र्यांना पाठवला १० हजारांचा चेक; म्हणाला गांजा पिकविण्याची परवानगी दिली …

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,29 ऑक्टोबर 2020 :-  राज्य सरकारने अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी दहा हजार रुपयांची मदत देऊन थट्टा केली आहे, असा आरोप करीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावानेच दहा हजार रुपयांचा धनादेश श्रीरामपूर येथील निलेश शेडगे या शेतकऱ्याने प्रशासनाला दिला आहे.

हा धनादेश मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात यावा, अशी विनंतीही या शेतकऱ्याने केली आहे. दरम्यान, या शेतकऱ्याने कॅनरा बँकेच्या धनादेशासह एक निवेदन मुख्यमंत्री यांना पाठवण्यासाठी श्रीरामपूर तालुका प्रशासनला दिले आहे. हे निवेदन व धनादेश नायब तहसीलदार ज्योती गुंजाळ यांनी तहसीलदारांच्या वतीने स्वीकारले आहे

त्यांनी एक निवेदनही जिल्हा प्रशासनाला दिले आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, ‘सरकारने शेतकऱ्यांना हेक्टरी दहा हजार रुपये मदत देण्याचे जाहीर करून शेतकऱ्यांची थट्टाच केली आहे. सरकारची मदत ही तुटपुंजी असून त्यातून कोणताही आधार मिळणार नाही. या मदतीचा आपण निषेध करत आहोत.

त्यामुळे सरकारला दहा हजार रुपयांचा महसूल दिला. शेतकऱ्यांना जर गांजा आणि खसखस पिकविण्याची परवानगी दिली तर सरकारी मदतीची गरज पडणार नाही. त्यातून ते सक्षम होतील, असे शेडगे यांनी स्पष्ट केले आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24