Sugarcane Workers : कारखाना कार्यस्थळावर तीन वर्षांपासून ऊस तोडणी कामगार व कारखान्यातील कामगारांची आरोग्य तपासणी करून काळजी घेतली जाते. कारखान्याचे अध्यक्ष अॅड. प्रतापराव ढाकणे हे कर्मचाऱ्यांना आपल्या कुटुंबाच्या सदस्य मानतात.
कामगारांच्या जीवावर कारखान्याचे भवितव्य अवलंबून असल्याने त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे कारखान्याचे कर्तव्य असल्याचे प्रतिपादन कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी अश्विनकुमार घोळवे यांनी केले.
बोधेगाव येथील संघर्षयोद्धा बबनराव ढाकणे केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष अॅड. प्रतापराव ढाकणे व कारखान्याचे अध्यक्ष ऋषिकेश ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली ऊसतोडणी कामगार व कारखान्यातील कामगारांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, या वेळी ते बोलत होते.
या वेळी हातगाव प्रा. आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सोनाली तिडके, वैद्यकीय अधिकारी डॉ. सुषमा सांजेकर, समुदाय अरोग्य अधिकारी डॉ. आस्मिता पुंडे, आरोग्य सेविका डॉ. जाकीरा सय्यद व आरोग्य कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.
या वेळी प्रभारी कार्यकारी संचालक रमेश गर्ने, प्रशासकीय अधिकारी पोपटराव केदार, तीर्थराज घुंगरड, शरद सोनवणे, त्रिंबक चेमटे, तुकाराम वारे, विक्रम केदार, किसन पोपले, पांडुरंग पायघन, सचिन राऊत् रावसाहेब दहिफळे, भगवान सोनवणे, विकास भिसे, राजेंद्र लवांडे, बाप्पासाहेब आंधळे, चंद्रकांत शिवे उपस्थित होते. सूत्रसंचालन शरद सोनवणे यांनी केले. प्रास्ताविक प्रभाती कार्यकारी संचालक रमेश गर्ने बाने केले. तीर्थराज घुगरड यांनी आभार मानले.