अहमदनगर Live24 टीम,8 सप्टेंबर 2020 :-पारनेर तालुक्यातील दुर्गम भागात जमिन व भाऊबंदकीच्या वादातून सासऱ्याने आपल्या सुनेचा तर दिराने भावजईचा विनयभंग करण्याचा प्रकार घडला.
या प्रकरणी पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी पीडितेचा सासरा अर्जून किसन कोकाटे (वय ५५) व दिर सुनील अर्जून कोकाटे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी या दोनही आरोपींना अटक केली आहे.शनिवार दि.५ सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता पारनेर तालुक्यातील मांडओहळ परिसरातील वारणवाडी शिवारात हा प्रकार घडला.
या प्रकरणात परस्परविरोधी फिर्यादी दाखल झाल्या असून दुसऱ्या पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून या पीडितेच्या दीर दिलीप अर्जून कोकाटे यांच्याविरोधात पीडितेचा विनयभंग करण्याचा तर पीडितेला मारहाण केलेल्या संदर्भात पीडितेच्या जावेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसऱ्या गुन्ह्यात अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नाही. कोकाटे कुटुंबात जमिनीवरून व त्या ठिकाणी असलेल्या खानावळीवरुन वाद आहेत.या वादाचे पर्यवसान हाणामारीत व त्यातून परस्परांविरोधात विनयभंगाचे गुन्हे दाखल करण्यात झाले आहे.
पहिल्या गुन्ह्यासंदर्भात पीडितेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की,दि.५ सप्टेबर रोजी दुपारी दोन वाजता,फिर्यादीने तीच्या पतीला केलेल्या मारहाणीबाबत विचारणा केल्याचा राग आल्याने फिर्यादीचे सासरे व दीर हे फिर्यादीचे पती दिलीप कोकाटे यांना मारहाण करत असताना
फिर्यादी त्यांना सोडवण्याचा प्रयत्न करत असताना आरोपींनी फिर्यादीचे केस ओढून अश्लील शिवीगाळ केली. लाथाबुक्क्यांनी मारहाण करत असताना त्यांनी फिर्यादीला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. तसेच बघून घेण्याची धमकी दिली या फिर्यादीवरून पोलिसांनी पीडितेचा सासरा व दिलावर विनयभंग व मारहाणीचा गुन्हा दाखल करुन
त्यांना अटक केली आहे. दुसऱ्या पीडितेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की दि.५ सप्टेबर रोजी दुपारी दोन वाजता फिर्यादी, तिचे पती व सासरे हे रिया खानावळी समोर उभे असताना सदर खानावळ वडिलांचे जमिनीत असून तुम्ही येथे रहावयाचे नाही तुम्ही खानावळ बंद करा असे म्हणाल्यावर
फिर्यादीचे सासरे त्यांना म्हणाले की सदर जमीन मुलगा सुनील हाच करणार असे म्हणालेचा राग येऊन त्यांनी शिवीगाळ धक्काबुक्की केली असता फिर्यादी व तिचा पती सोडविण्यास गेले असता आरोपी दिलीप अर्जून कोकाटे याने फिर्यादीस लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले
व फिर्यादीचे पतीस मारहाण केली व आरोपीच्या पत्नीने ने आपणास खाली पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली व मंगळसूत्र तोडून नुकसान केले.पीडीतेच्या फिर्यादीवरून पोलिसांनी तीचा दीर व जावेविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved