अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2021 :- महिला सक्षमीकरणासाठी देशभरातून विविध उपक्रम राबविले जात आहे. समाजातील महिलांना मान मिळवा त्यांची प्रगति व्हावी यासाठी प्रयत्न केलेले जाऊ लागले आहे. मात्र दुसरीकडे नगर जिल्ह्यात एक लज्जास्पद घटना घडली आहे.
परिवहन मंडळाच्या बसमध्ये महिलेची छेडछाड झाल्याची घटना घडली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, श्रीगोंद्यातून नगरला जाण्यासाठी निघालेल्या एका महिलेचा श्रीगोंदा-त्र्यंबकेश्वर गाडीच्या वाहकाने गाडीमध्ये शेजारी बसल्यानंतर तिच्याशी अश्लील चाळे करीत, छेडछाड केल्याबाबत माहिती समजली आहे.
यानंतर नमूद महिलेने प्रवासादरम्यान गावातील संबंधितांना फोन करून, एसटीत घडलेला प्रकार सांगितला. दरम्यान एसटी बस नगरच्या माळीवाडा बस स्थानकावर पोहचताच. महिलेचे नातेवाईक बसस्थानकांवर उपस्थित होते. यावेळी गाडीतून वाहक खाली उतरताच त्याची नातेवाईकांनी यथेच्छ धुलाई केली.
महिलेची छेडछाड करणार्या या एसटी वाहकाला नागरिकांनी माळीवाडा बसस्थानकात चांगलाच चोप दिला. सदर महिला श्रीगोंदा बसस्थानकातून नगरकडे येण्यासाठी श्रीगोंदा-त्रिंबकेश्वर या बसमध्ये बसली होती.