अहमदनगर Live24 टीम,30 जुलै 2020 :-तालुक्यातील पिंपळगाव फुणगी परिसरात धुमाकूळ घालणारी ३ वर्षाची बिबटमादी राहुरी वनविभागाच्या पिंजऱ्यात कैद झाली आहे. बिबट्यामादी जेरबंद झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी सुटकेचा सुस्कारा सोडला आहे.
या बिबट्यामादी गेल्या पंधरवाड्या पासून पिंपळगाव फुणगी,दवणगाव परिसरातील शेतक-यांच्या वस्तीवरील कुञे तसेच २ शेळ्यांची शिकार केली होती.
पाळीव प्राण्यावर हल्ल्याच्या घटनेने या भागातील शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. या भागातील शेतकऱ्यांच्या मागणीनुसार २१ जुलैला सुनील वरपे
यांच्या शेती गटनंबर १७० मध्ये वनविभागाच्या वतीने पिंजरा लावण्यात आला होता. मात्र बिबट्यामादी हुलकावणी देत होती. अखेर मंगळवारी रात्री ८ वाजता पिंजऱ्यात ठेवण्यात आलेल्या
शेळीची शिकार करण्यासाठी गेलेली बिबट्यामादी वनविभागाच्या पिंजऱ्यात जेरबंद झाली. बिबटमादी पिंजऱ्यात अडकल्याची खबर वाऱ्यासारखी पसरल्याने घटनास्थळी बघ्यांची गर्दी जमली होती.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा
ahmednagarlive24@gmail.com