अहमदनगर बातम्या

बघता बघता आगीने शेतकऱ्यांचा सात एकर ऊस केला भस्मसात

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 18 ऑक्टोबर 2021 :- उसाच्या शेताला आग लागल्यानं शेकऱ्याचे मोठे नुकसान झाले असल्याची दुर्दवी घटना श्रीरामपूर तालुक्यातील गोंडेगाव येथे घडली आहे.

दरम्यान या दुर्घटनेत शेतकरी धनंजय ज्ञानदेव बढे, सयाजी जनार्दन फोपसे, भाऊसाहेब पुंजा खडके तसेच विक्रम किशोर लबडे यांच्या शेतकऱ्यांच्या शेतातील सुमारे 7 एकर 10 गुुंठे उसास आग लागल्याची घटना घडली.

दरम्यान आग कोणत्या कारणाने लागली याचे अद्याप कारण समजू शकले नाही. वर्षभर सांभाळलेले उसाचे पीक या आगीमुळे जळून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

आधीच मागील दोन वर्षांपासून करोनाच्या महामारीमुळे आर्थिक उत्पन्न बंद झाले. ही कुटुंबे उसावर अवलंबून होती. ऊस जळाल्याचे पाहून शेतकरी मोठ्याने टाहो फोडत आरडाओरडा करत रडत होते.

ऊस जळाल्याने त्यांचे मागील एकवर्ष व पुढील ऊस उभा करण्याकरिता एक वर्ष असे दोन वर्षे वाया जाणार आहेत. या घटनेचा पंचनामा करून शेतकर्‍यांना शासनाकडून तातडीने मदत मिळावी, अशी मागणी येथील शेतकर्‍यांनी केली आहे.

Ahmednagarlive24 Office