अहमदनगर Live24 टीम, 13 जानेवारी 2021 :- गेल्या अनेक महिन्यांपासून कोरोनाचे संकट घोंगावत आहे. दरम्यान आता नगरकरांसाठी एक दिलासादायक माहिती समोर अली आहे.
दहा महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर कोरोनाची लस उपलब्ध झाली असून, नगरमध्ये बुधवारी पहिली लस दाखल होणार आहे. लस नगरमध्ये आल्यानंतर ती जिल्हा परिषदेच्या औषध कक्षात ठेवली जाणार आहे.
तेथून जिल्हा शासकीय रुग्णालय व महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना लस वितरित केली जाणार आहे. नगर जिल्ह्यातील १३ तालुक्यांतील २ उपजिल्हा शासकीय रुग्णालये व ११ ग्रामीण रुग्णालयांना लागणारी कोरोना लस गुरुवारी जिल्हा परिषदेच्या औषध कक्षातून जिल्हा शासकीय रुग्णालयास देण्यात येणार आहे.
१६ जानेवारीपासून प्रत्यक्ष लसीकरणाला सुरुवात होईल. नगर जिल्ह्यात पहिल्या दिवशी २१ केंद्रांवर लस दिली जाणार आहे. त्यात नगर जिल्हा शासकीय रुग्णालयाचाही समावेश आहे.
दरम्यान पुण्यातील कुटुंब कल्याण कार्यालयांतून कोरोनाची सिरम कंपनीची कोव्हिशिल्ड लस राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात दिली जाणार आहे.
मात्र, केंद्राकडून रात्री दहापर्यंत महाराष्ट्रातील लस वितरणाबाबत मेसेज न आल्याने तब्बल बारा तास लस घेण्यासाठी आलेली वाहने थांबल्याचे सूत्रांकडून समजले. त्यामुळे या परिसरात वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.