महापालिकेच्या स्थायीची सभागृहातील पहिली सभा या दिवशी पार पडणार

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 26 डिसेंबर 2020 :-महापालिकेच्या स्थायी समितीची पहिलीच सभा सोमवारी (दि. 28) प्रत्यक्षपणे सभागृहात होत आहे. सभापती मनोज कोतकर यांनी सोमवारी (दि.28) स्थायी समितीची सभा बोलविली आहे.

मुख्य लेखा परीक्षक चंद्रकांत खरात यांच्या मनमानी व चुकीच्या कारभारामुळे त्यांच्यावर कारवाईचा प्रस्ताव सभेसमोर ठेवण्यात आला आहे. सभेसमोर 18 विषय ठेवण्यात आले आहे.

त्यात प्रामुख्याने महापालिकेच्या अग्निशामक विभागाला नवीन वाहन खरेदीचा प्रस्ताव ठेवला आहे. सभेतील या मुख्य विषयांवर चर्चा रंगणार… बीएस 6 जनरेसेशनची वाहने खरेदी केली जाणार आहेत.

अशोक लेलँडऐवजी टाटा मोटर्सच्या वाहन खरेदीचा प्रस्ताव सभेसमोर चर्चेला येणार आहे. सावेडीतील रासनेनगर ते प्रेमदान चौकापर्यंत रस्ता डांबरीकरण करण्याच्या निविदेस मंजुरीचा विषय सभेसमोर आहे.

महापालिकेच्या देशपांडे हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय अधिकारी जोशी यांना तांत्रिक खंड देऊन सहा महिन्यांकरिता पुनर्नियुक्ती, विद्युत विभागात सेवानिवृत्त अभियंत्यांना मुदतवाढ तसेच पाणीपट्टी व शास्तीची रक्कम व निर्लेखनाचे विषय या सभेसमोर आहेत.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24