पहिली गेली दुसरी केली मात्र तिच्यासोबत केले असे धक्कादायक ; राहुरी तालुक्यातील घटना

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : पहिले लग्न झालेले असताना परत दुसरे लग्न केले. मात्र या लग्नाबाबत पत्नीला माहिती दिली नाही. मात्र नंतरच्या काळात जेव्हा तिला समजले कि आपल्या पतीचे पहिले लग्न झालेले असून त्याला एक आठ वर्षांचा मुलगा आहे.

त्याची पहिली बायको त्याला सोडून गेली आहे. आपली फसवणूक केली असल्याचे लक्षात आल्याने याबाबत जेव्हा तिने विचारणा केली असता, उलट तिलाच दमबाजी करत. घर घेण्यासाठी माहेरून ४० लाख रुपये आण, अशी मागणी करत सासरच्या लोकांनी विवाहित महिलेचा शारीरीक व मानसिक छळ केल्याची अगदी चित्रपटाला साजेशी अशी काहीशी घटना राहुरी तालुक्यात घडली आहे.

याबाबत स्नेहल सुहास मिरपगार (वय ३२ वर्षे, रा. मराठी शाळेजवळ, लक्ष्मीनगर, ता. शेवगाव, हल्ली रा. कासार गल्ली, ता. राहुरी) या विवाहित महिलेने
दिलेल्या फिर्यादीवरून सासरच्या सात लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्नेहल सुहास मिरपगार या विवाहित राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले, सुहास मिरपगार हा शेवगाव येथे राहत असून तो नेवासा पंचायत समितीमध्ये नोकरीस आहे. त्याचा विवाह स्नेहल मिरपगार यांच्याशी दि. २४ सप्टेंबर २०२३ रोजी झाला होता. लग्नानंतर काही दिवसांनी सासरचे लोक किरकोळ कारणावरून स्नेहल यांना शिवीगाळ करून मारहाण करू लागले.

दरम्यान सुहास याचे पहिले लग्न झालेले असून त्याला एक आठ वर्षांचा मुलगा आहे. त्याची पहिली बायको त्याला सोडून गेली. असे स्नेहल यांना कळाले. तेव्हा सुहास याने स्नेहल यांना दमदाटी करून गप्प बसविले. त्यानंतर घर घेण्यासाठी स्नेहल यांनी माहेरहून ४० लाख रुपये आणावेत या मागणीसाठी सासरचे लोक स्नेहल यांचा शारीरीक व मानसीक छळ करू लागले.

सासरच्या त्रासाला कंटाळून स्नेहल सुहास मिरपगार यांनी राहुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दाखल केली. त्या फिर्यादीवरून सुहास विद्यानंद मिरपगार, सलोमीनी विद्यानंद मिरपगार, विद्यानंद वसंत मिरपगार, प्रविणकुमार विद्यानंद मिरपगार, अमृता प्रविणकुमार मिरपगार, सासुची बहीण पुष्पा कांबळे, पतीचे मामा सॅमसन ठोंबे, सर्व रा. ता. शेवगाव. या सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Ahmednagarlive24 Office