वारकरी संप्रदायाची पताका विश्‍वभर फडकणार -अनिल महाराज वाळके

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 24 नोव्हेंबर 2020 :- वारकरी संप्रदायाची शिकवण मठात न ठेवता घरोघरी पोहचविण्याचे कार्य अ.भा. वारकरी मंडळ करीत आहे. संत संगतीने उदयास आलेल्या संघटनेचा भविष्यकाळ उज्वल आहे.

लवकरच ग्रंथ ज्ञानेश्‍वरीचे पारायण सोहळा अमेरिकेत होणार असून, याची तयारी सुरु आहे. वारकरी संप्रदायाची पताका विश्‍वभर फडकणार असल्याचा विश्‍वास अ.भा. वारकरी मंडळाचे प्रदेशाध्यक्ष अनिल महाराज वाळके यांनी व्यक्त केला. तर जागा उपलब्ध करुन दिल्यास संघटनेच्या पुढाकाराने राज्यातील पहिले वारकरी भवन जिल्ह्याच्या शहरालगत उभे राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

वडगाव गुप्ता (ता. नगर) दत्त मंदिर येथे झालेल्या अ.भा. वारकरी मंडळाच्या संत वारकरी मेळावा व नगर तालुका कार्यकारणी नियुक्तीपत्र प्रदान सोहळ्याप्रसंगी अध्यक्षीय भाषणात अनिल महाराज बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून धनगरवाडी विठ्ठल आश्रमचे ह.भ.प. बाळकृष्ण महाराज केद्रे, संत संमेलन प्रमुख ह.भ.प. अतुल महाराज आदमाने, जिल्हाध्यक्ष ह.भ.प. गणेश महाराज डोंगरे, सहाजिल्हाध्यक्ष ह.भ.प. महादेव महाराज शिरसाठ,

जिल्हा उपाअध्यक्ष राम महाराज उदागे, मंहत साध्वी नर्मदा चैतन्य माताजी, रामायणाचार्य अमोल महाराज सातपुते, ह.भ.प. लक्ष्मण महाराज गव्हाणे, वडगाव गुप्ताचे सरपंच विजय शेवाळे, नवनागापूरचे उपसरपंच डॉ. बबनराव डोंगरे आदींसह संघटनेचे पदाधिकारी, सदस्य, वारकरी व परिसरातील भाविक उपस्थित होते. पुढे अनिल महाराज म्हणाले की, टाळेबंदी काळात राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प. प्रकाश महाराज बोधले यांनी

ऑनलाईन बैठका घेऊन अ.भा. वारकरी मंडळाचे संघटन सक्षम करण्यास पुढाकार घेतला. संघटनेची पदे कोणालाही न वाटता सक्षम व्यक्तीलाच त्यांच्या गुणवत्तेप्रमाणे मुख्य कार्यालयातून विचारविनीमय होऊन पदे देण्यात आली आहे. सरकारी योजनांचा लाभ वारकर्‍यांना मिळण्यासाठी संघटना कार्यकरीत आहे. तर राज्य शासनाकडे विद्यापिठाची मागणी करण्यात आली असून, त्या दृष्टीने पाठपुरावा सुरु आहे.

या विद्यापिठाच्या माध्यमातून गावागावात परीक्षा केंद्र उभारुन हरीपाठ, अभंग, किर्तन, प्रवचनासह वारकरी संप्रदायाचे धर्म शिक्षण मुलांना बालवयातच दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या प्रारंभी भगव्या ध्वजाचे पूजन करण्यात आले. तर संत ज्ञानेश्‍वर व संत तुकाराम महाराजांच्या प्रतिमांचे पूजन करुन दीपप्रज्वलनाने संत वारकरी मेळाव्याचे शुभारंभ झाले.

नगर तालुका कार्यकारणी अ.भा. वारकरी मंडळाचे जिल्हाध्यक्ष गणेश महाराज डोंगरे व प्रदेशाध्यक्ष अनिल महाराज वाळके यांच्या शिफारसीने राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प. प्रकाश महाराज बोधले यांनी मान्यता दिली आहे. उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते नवनिर्वाचित अ.भा. वारकरी मंडळाचे नगर तालुकाध्यक्ष अमोल महाराज सातपुते, उपाध्यक्ष विठ्ठल महाराज फलके, कोषाध्यक्ष सुदाम महाराज दारकुंडे, मुख्य सचिव अमोल महाराज जाधव,

सार्वजनिक मंदिर कमिटी प्रमुख विजय भालसिंग, महिला प्रमुख ह.भ.प. हिराताई मोकाटे, महिला उपप्रमुख लंकाताई वाघ, महिला सचिव शैलजाताई मुळे, दिंडी प्रमुख वसंत महाराज शेजुळ, संघटक मच्छिंद्र महाराज रोहोकले, उपप्रमुख जालिंदर महाराज कुलट, युवा प्रमुख श्रीकृष्ण महाराज रायकर, युवा उपप्रमुख ओंकार महाराज शिर्के, वारकरी शिक्षण समिती प्रमुख बाजीराव महाराज वराट, उपप्रमुख अवधुत महाराज काळे,

सचिव सचिन महाराज कदम, गो पालक सचिव रोहीदास महाराज जाधव, ग्रामकमिटी वडगाव गुप्ता अध्यक्ष लक्ष्मण महाराज गव्हाणे, कृष्णा महाराज दांगट यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. जिल्हाध्यक्ष गणेश महाराज डोंगरे यांनी हिंदू संस्कृती टिकवण्यासाठी अशा धार्मिक संघटनेची गरज आहे. एकत्र आल्याशिवाय मोठे कार्य घडणार नाही. मंदिरे बांधण्यापेक्षा त्याची जोपासणा अधिक महत्त्वाची आहे.

विविध समती स्थापन करुन पदाधिकार्‍यांच्या नियुक्त्या करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. बाळकृष्ण महाराज केंद्रे यांनी वारकरी संप्रदायावर राजकारणी व इतर संप्रदायाचा आघात होत आहे.

संयम व त्यागावर वारकरी संप्रदाय टिकून असून,अ.भा. वारकरी मंडळ वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार करीत असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल महाराज सातपुते यांनी केले. उपस्थितांचे आभार ह.भ.प. भाऊसाहेब रोहकले यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विजय भालसिंग, रोहीदास महाराज जाधव, सुदाम महाराज दारकुंडे, ह.भ.प. हिराताई मोकाटे यांनी परिश्रम घेतले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24