अहमदनगर Live24 ,19 जून 2020 : अनेकवेळा दिग्गज मंत्र्यांनाही निवडणुकीत पराभव पत्करावा लागतो. त्यामुळे मी पराभूत झालो असलो तरी कोणाविषयी माझ्या मनात वैमनस्य नाही. मी केवळ निवडणुकीत पराभूत झालो आहे.
मात्र मी रणांगणही सोडणार नाही. असे मत माजी आमदार विजय औटी यांनी व्यक्त केले. पारनेर तालुक्यात एका कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले की, निवडणुकीतील यश-अपयश हे तात्पुरते असते.
त्यामुळे निवडणुकीत जर पराभव झाला तर कोणाविषयी मनात वैमनस्य असू नये. त्यामुळे आपण राजकारणात सक्रिय असून भविष्यात ग्रामस्थांना शुद्ध पाणी मिळावे यासाठी आरओ प्लांट’, तरुणांसाठी व्यायामशाळा उभारणार असल्याचे त्यांनी सांगितले.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews