अहमदनगर Live24 टीम, 30 नोव्हेंबर 2020 :-राहुरी तालुक्यातील म्हैसगावमध्ये थेट मतदारांतून निवडलेल्या सरपंचावर सदस्यांनी अविश्वास ठराव आणला होता. मात्र मतदारांतून निवडलेल्या सरपंचावर अविश्वास ठराव आणण्याचा अधिकार सदस्यांना नसून ग्रामसभेला आहे.
त्यामुळे एक महिन्यानंतर येथील सरपंचाला पुन्हा पद बहाल करण्यात आले होते. दरम्यान सरपंचावरील ठराव मांडण्यासाठी बुधवार दि. 2 डिसेंबर रोजी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले आहे.
त्यामुळे सत्तेवरून पायउतार झाल्यानंतर पुन्हा महिनाभरात सरपंचपदी विराजमान झालेल्या सरपंच महेश गागरे यांचे सत्तेचे भवितव्य ग्रामसभा ठरविणार आहे.
राहुरी तालुक्यासह जिल्ह्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष या ग्रामसभेकडे लागले आहे. लोकनियुक्त सरपंचांवर अविश्वास ठराव मांडण्यासाठी जिल्ह्यातील ही पहिलीच ग्रामसभा असून यात ग्रामस्थांचे गुप्त मतदान होणार असून ग्रामसंसदेच्या सर्वोच्च अधिकाराचा पहिल्यांदाच वापर होणार आहे.
थेट जनतेतून निवडून आलेल्या सरपंचांचे पद, ग्रामसभेत गुप्त मतदान घेऊन अविश्वास प्रस्ताव मंजूर होईपर्यंत रद्द करता येणार नाही, असे आदेश दिले. यावर सरपंच गागरे यांनी औरंगाबाद उच्चन्यायालयात याचिका दाखल करून सरपंचपद राखले.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved