रस्ता लूट करणाऱ्या टोळीस पोलिसांनी केले गजाआड

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 26 डिसेंबर 2020 :- जिल्ह्यात लुटमारी, दरोडा, चोऱ्या आदी घटनांमध्ये वाढच होत आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळते आहे.

दरम्यान वाढत्या गुन्हेगारीला रोखण्यासाठी पोलीस प्रशासन देखील सक्रिय झाले आहे. नुकतेच गाड्या अडवून प्रवाशांना लुटणारी सराईत टोळी जेरबंद करण्यात सुपा पोलीसांना यश आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, शुक्रवार दि.२५ रोजी ४ वाजता रस्ता लुट प्रकरणी तपास चालू असताना जातेगाव घाटात दोन दुचाकीवर सहा इसम बसलेले आढळून आले.

हे आरोपी सुपा पोलीस स्टेशनला दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपींच्या वर्णनाशी मिळते जुळते असल्याने पोलीस निरीक्षक नितीनकुमार गोकावे यांनी तात्काळ संबंधितांकडे चौकशी सुरू केली.

या तरुणांमधील नयन राजेंद्र तांदळे (वय- २६ राहणार भिस्तबाग चौक अहमदनगर) असे सांगितले. त्यांची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एक चाकू जिन्स पॅन्टच्या खिशात ठेवलेला आढळून आला.

तसेच विठ्ठल भाऊराव साळवे (राहणार झापवाडी ता.नेवासा), अक्षय बाबासाहेब ठोबरे (राहणार सावेडी), शाहुल अशोक पवार (वय ३१), व अमोल छगन पोटे (वय २८ दोघे राहणार सुपा, ता.पारनेर)

यां सर्वांच्या खिशात मिरची पावडरची पुडी मिळून आली. चौकशी सुरू असताना दुसऱ्या दुचाकीस्वार बसलेल्या तीन पैकी एक इसम अंधाराचा फायदा पळून जाण्यात यशस्वी झाला.

दरम्यान या पाच जणांना अटक करण्यात आली असून त्यांना पारनेर येथील न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

अहमदनगर लाईव्ह 24