Ahmednagar News : घरातील इतर सदस्य घरात नसताना तसेच मुलगी किचनमध्ये स्वयंपाक करण्यात गुंतलेली असताना अज्ञात दोन भामट्यांनी घरात घुसून दोन लाखांचे दागिने लंपास केल्याची घटना बोल्हेगाव परिसरातील गांधीनगर येथे घडली आहे.
याबाबत सारिका भरत आवारे यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत अधीक माहिती अशी, सारिका आवारे व त्यांचे पती भरत आवारे हे पत्नी दोघे कामावर गेलेले होते यावेळी घरात त्यांची मुलगी किचनमध्ये स्वयंपाक करण्यात मग्न असताना दोघा तरुणांनी घरात प्रवेश करत घरातील कपाटातून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा १ लाख ९२ हजारांचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली.
याबाबत सारिका भरत आवारे (रा. निसर्ग रो हाऊसिंग, गांधीनगर, बोल्हेगाव) यांनी सोमवारी (दि.१) रात्री तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. चोरीची ही घटना शनिवारी (दि.२९) सायंकाळी ७ ते ७.३० च्या सुमारास घडली आहे.
त्यावेळी फिर्यादी सारिका व त्यांचे पती हे कामावर गेलेले होते. तर घरात त्यांची मुलगी एकटीच होती.ती किचनमध्ये स्वयंपाक करण्यात मग्न असताना त्यांच्या घरात त्यांच्या ओळखीचे असलेले विशाल बाबासाहेब पाटोळे व नयन पाटोळे (दोघे रा. गांधीनगर, बोल्हेगाव) हे दोघे घुसले.
त्यांनी कपाट उघडून त्यातून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा १ लाख ९२ हजारांचा ऐवज चोरून नेला असल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे. या फिर्यादी वरून पोलिसांनी दोघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे .