Ahmednagar News : अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन करून छेडछाड करत तिच्या कुटुंबातील तिघांना जबर मारहाण करण्यात आली. गुरुवारी (१८ एप्रिल) दुपारी ४ वाजता संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पठार येथे हा प्रकार घडला. तालुका याप्रकरणी २६ जणांवर गुन्हा दाखल केला.
मुलीच्या वडिलांनी फिर्यादीत म्हटले आहे की, मुलगी घरी जात असताना पल्सर (एमएच १७ सी. वाय. ०३०) दुचाकीवर मयूर अशोक वामन, आदेश अशोक वामन व आदिनाथ अशोक वामन यांनी मुलीचा रस्ता अडवून तिची छेड काढली. याची विचारणा मुलीच्या कुटुंबाने केली असता जमावाने मुलीच्या आई-वडिलांसह चुलत भावाला घरासमोर शिवीगाळ, दमदाटी करून लोखंडी गज, कुळवाचा फास, काठी व दगडाने मारहाण केली.
या घटनेत तिघे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुलीच्या वडिलांच्या फिर्यादीवरून घारगाव पोलिसांनी मयूर अशोक वामन, आदेश अशोक वामन, आदिनाथ अशोक वामन, योगेश सखाराम उगले,
तुकाराम लक्ष्मण कारंडे, भाऊ अनाजी वामन, सुमनबाई सखाराम उगले, अशोक लहानू वामन, पप्पू अशोक वामन, संदेश वसंत वामन, गणेश जयवंत वामन, सार्थक बाळू वामन, प्रणव शिवाजी वामन, दीपक शंकर दुबे, पपू छबू काळे, रामचंद्र साहेबराव काळे, वसंत अनाजी वामन, शिवाजी अनाजी वामन, जयवंत अनाजी वामन, लहानू नानाभाऊ वामन, अनाजी नानाभाऊ वामन, बाबू शंकर दुबे, अमित अशोक वामन, राहुल कारंडे, (शेंडेवाडी),
बबलू बाळासाहेब शेंडगे (बिरेवाडी), सचिन गजानन चितळकर (साकूर, ता. संगमनेर) आदी २६ जणांवर बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण व विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला.
महिलेने मुलीच्या वडिलांना फोन करुन माळावर बोलावले, त्यानंतर..
मुलीच्या वडिलांना सुमन उगले नामक महिलेने फोन करून त्यांच्या घराच्या पाठीमागील मोकळ्या माळावर बोलावले होते. याचे कारण की, चर्चा करून भांडण मिटविण्यासाठी तेथे त्यांना बोलावले होते.
मुलीचे वडील तेथे गेले असता उगले हिने एक फोन केला व तेथे ५०-६० माणसे जमा झाली. त्यांनी मुलीचे वडील आणि त्यांच्या नातेवाइकांवर दगडफेक करत गज, दगड, काठीने जबर मारहाण केल्याचा प्रकार घडला.