महायुतीने लोकसभेचे उमेदवार डॉ.सुजय विखे पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आयोजित केलेल्या सभेनंतर महायुतीच्या कार्यकर्त्यांनी सभा पटांगणाची साफ सफाई करून एक आगळा वेगळा आदर्श लोकांसमोर ठेवला. यामुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांचे लोकांकडून कौतूक केले जात आहे.
खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी मोठ्या शक्ती प्रदर्शात सोमवारी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. ततपुर्वी त्यांनी नगर मधील सर्व महापुरूषांना अभिवादन केले. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून आपल्या प्रचार फेरीला सुरवात केली.
यात असंख्य महिला, वृद्ध आणि कार्यकर्ते सामिल झाले होते. कुणाला उन्हाचा फटका लागू नये यासाठी पाण्याच्या बाटल्याची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी बाटल्यांचा खच निर्माण होऊन कचरा रस्त्यावर पसरू नये म्हणुन काही कार्यकर्ते केवळ या बाटल्या जमा करून साफ सफाई करण्यात व्यस्त होते. तर दिल्ली गेट येथे या प्रचार रॅलीची सांगता झाल्यावर सभेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भाषणे झाली. तर राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर, महसुल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आ. प्रा.राम शिदे, आ. संग्राम जगताप, माजी अरूणकाका जगताप, आ. मोनिका राजळे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख बाबुशेवठ टायरवाले,
भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग , राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नाहाटा, शहर अध्यक्ष अभय आगरकर, रिपाईचे भैलुमे यांच्यासह राष्ट्रवादी, शिवसेना, मनसे, रिपब्लिक पार्टी आठवले गट तथा मित्र पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. सर्वच बडे मंत्री असल्याने या सभेला लोकांची प्रचंड गर्दी उसळली होती.
इतक्या मोठ्या प्रमाणात लोक असल्याने सर्व ठिकाणी पाण्याच्या बाटल्या पडल्या होत्या. पण सभा संपल्यानंतर महायुतीच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी सुद्धा साफ सफाई करत पटांगण केले. कार्यकर्त्यांचा हा उपक्रम पाहून अनेकांना या गोष्टीचे कौतूक वाटले. अशा प्रकारे महायुतीचे कार्यकर्ते काम करत असल्याने लोकांच्या आशा वाढल्या आहेत.