मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत सरकार बाजू मांडण्यात कमी पडले !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,16 सप्टेंबर 2020 :- मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत सरकार बाजू मांडण्यात कमी पडल्याचा आरोप सुकाणू समितीचे जिल्हाध्यक्ष गणेश झगरे यांनी केला. 

मराठा समाजाचे नुकसान टाळण्यासाठी यासंदर्भात घटनापीठानेही सुनावणी जलदगतीने घेऊन त्वरित योग्य तो व सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी मराठा सुकाणू समितीच्या बैठकीत करण्यात आली.

मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीला सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या स्थगिती संदर्भात बोलताना गणेश झगरे म्हणाले, अनेक लढ्यानंतर मराठा समाजाचा आरक्षणाचा विषय मार्गी लागला होता,

मात्र त्यावेळच्या सरकारने बाजू व्यवस्थितपणे मांडली नसल्याने मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाली. याबाबत मराठा सुकाणू समिती जिल्हाभर आंदोलन छेडणार असल्याचेही झगरे यांनी सांगितले.

मराठा समाजातील तरुणांचे शैक्षणिक व नोकरीत होणारे नुकसान टाळण्यासाठी सध्या हे प्रकरण ज्या पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे वर्ग केले आहे,

त्या घटनापीठाने या आरक्षणाबाबतची सुनावणी घेऊन यासंदर्भात निर्णय घेणे गरजेचे असल्याचेही मत झगरे यांनी व्यक्त केले. याप्रसंगी डॉ. कृषिराज टकले, सुभाष गागरे, सुनील कोळसे, अॅड. संदीप कापसे आदी उपस्थित होते.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24