सरकारला झुकविणारी शक्ती उभी करावी लागेल – आण्णा हजारे

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 27 नोव्हेंबर 2020 :-देशात ख-या अर्थाने लोकशाही आणावयची असेल तर जनतेमध्ये सरकारला झुकविणारी शक्ती उभी करावी लागेल व ती जनतेने ऊभी करावी लागणार आहे. कोणतेही सरकार आंदोलनास घाबरत नाही, तर ते सत्तेवरून पायऊतार होण्यास म्हणजेच पडण्याला घाबरते.

यासाठी जनआंदोलनाची गरज आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांनी केले आहे. यावेळी बोलताना हजारे म्हणाले कि, जनआंदोलनातून सरकारवर दबावगट तयार होतो. त्यामुळे सरकार जनतेला घाबरून जनहिताचे निर्णय घेते व जनहिताचे कायदे करते. संविधान दिनाच्या निमित्तानं हजारे यांनी एक व्हिडिओ संदेश जारी केला आहे.

त्यामध्ये आतापर्यंतच्या आंदोलनाचा आढावा घेतला असून लोकशाही बळकट करण्यासाठी ग्रामसभेला जादा अधिकार (व्हिलेज संसद) देण्याची मागणी केली आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून इतकी वर्ष झाली तरी सुद्धा देशात खरी लोकशाही आली नाही. अनेक पक्ष त्यात निर्माण झालेली झुंडशाही या मुळे जनतेला खरी लोकशाही मिळाली नाही.

स्वातंत्र्यानंतरही जनआंदोलनातून अनेक कायदे तयार झाले आहेत आता ख-या लोकशाहीसाठी लढा देणे गरजेचे आहे. जनआंदोलन हे मोठे हत्यार आहे याचा विसर जनतेला पडला आहे.

लोकपाल आंदोलनाच्या वेळी जनता ज्या प्रमाणे जागृत झाली त्याच प्रमाणे पुन्हा जागृत झाल्यास लोकशाही बळकट करणारा ग्रामसभेला जादा अधिकाराचा कायदा देशात होऊ शकतो असेही शेवटी हजारे यांनी शेवटी म्हटले आहे. त्यातून हजारे यांनी दुस-या देशव्यापी आंदोलनाचा सरकारला इशाराच दिला आहे.

‘ब्रिटिशांच्या राजवटीविरूद्ध जनशक्तीचा दबावच यशस्वी झाला होता. त्याच पद्धतीने आता लोकांनी पुन्हा संघटित होण्याची गरज आहे. स्वातंत्र्यानंतरही अशी आंदोलने अनेक कायदे मंजूर करून घेण्यात यश आलेलं आहे. आता आपल्याला खऱ्या लोकशाहीसाठी लढा द्यायचा आहे. असे हजारे यावेळी म्हणाले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24