अहमदनगर बातम्या

राज्यात स्वार्थासाठी एकत्र आलेल्या पक्षांचे सरकार; सुजय विखेंचे टीकास्त्र

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2021 :- स्वार्थासाठी एकत्र आलेल्या पक्षांचे सरकार म्हणजे महाविकास आघाडी सरकार असल्याचे बोलतच खासदार सुजय विखे यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. सध्या जिल्ह्यात नगरपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोलतां जाते म्हणाले कि, दोनही नगरपंचायत निवडणुकीत भाजपाचाच विजय होईल. विखे पुढे बोलताना म्हणाले की, मागच्या दोन वर्षांपासून महाविकास आघाडी सरकारची कामगिरी जनता पाहात आहे.

दोन वर्षांतील ही पहिलीच निवडणूक आहे, त्यामुळे भाजपाला पारनेर आणि कर्जत अशा दोनही मतदारसंघात अनुकूल वातावरण आहे. कर्जतचे माजी नगराध्यक्ष नामदेव राऊत राष्ट्रवादीत गेल्याने पक्षाला काहीही फरक पडणार नाही.

आमच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत, मात्र विरोधकांचा अजून उमेदवारच ठरला नाही. रोहित पवार आणि निलेश लंके यांच्याबद्दल जर जनतेला विश्वास वाटत असेल तर त्यांच्या उमेदवाराला निवडून द्यावे.

मात्र त्यामुळे भविष्यात पश्चताप करण्याची वेळ येऊ शकते अशी टीका त्यांनी यावेळी केली. विखे यांनी महाविकास आघाडीवर देखील निशाणा साधला आहे.

महाविकास आघाडीतील तीनही पक्ष नगर पंचायत निवडणुकीमध्ये एकत्र येणार नाहीत. मात्र निवडणूक झाल्यावर एकत्र येतील जनतेने यांचा ढोंगीपणा लक्षात घ्यावा. हे सरकारच मुळात स्वार्थासाठी एकत्र आले आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office