अहमदनगर Live24 टीम,4 ऑगस्ट 2020 :- बुथ हॉस्पिटल सारख्या ठिकाणी रुग्ण मोफत बरे होऊ शकतात. तर खाजगी हॉस्पिटलमध्ये या कोरोसाठी इतकी मोठी रक्कम मोजायची गरज आहे का? की अशी शंका एम.आय.एम. जिल्हा अध्यक्ष डॉ परवेज अशरफी यांनी उपस्थित करत.
शासनाने जर हे सर्व खासगी अतिदक्षता रुग्णालय ताब्यात घेऊन जर सामान्य जनतेला पूर्ण मोफत उपचार केलेतर नागरिकांना मोठा दिलासा मिळेल. सामान्य नागरिक लॉकडाऊन मुळे अधीच त्रस्त झाले आहे त्यांना मोठा आधार होईल, असे निवेदन एम.आय.एम. तर्फे अहमदनगर जिल्हा अधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांना देण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, अहमदनगर जिल्हात सध्या जिल्हा अधिकारी यांनी एक मोठा काम हाती घेतले आहे. ते म्हणजे कोरोना लागण झालेल्या व्यक्तीला शोधण्याचे. यासाठी संपूर्ण यंत्रणा कामाला लावली आहे. त्यामुळे अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढत असल्याचे दिसते.
परिस्थिती बदलली आहे नागरिक स्वतः तपासणी करून घेत आहे व काही त्रास असेल तर त्याप्रमाणे उपचार घेत आहे. आता काही खासगी रुग्णालातही कोरोना रुग्ण दाखल करून घेत आहे. परंतु त्यांचे शुल्क सामान्य जनतेसाठी परवडणारे नाहीत.चुकून सामान्य नागरिक यांच्याकडे गेला की पॅकेज बिल ऐकूनख अर्धा गार होतो. असे काही अनुभव आले आहे की काही खासगी रुग्णालय रिपोर्ट पाहिल्या पाहिल्या सांगतात की परिस्थिती खूप गंभीर आहे. ताबडतोब रुग्णालयात दाखल करून घ्यावे लागेल.
त्यानंतर पॉलिसी आहे का विचारतात आणी त्यानंतर आपले रुग्णालयाचे पॅकेज समजाऊन सांगतात. काही एक लाख, काही दीड लाख, काही तीन लाख असे मोठ-मोठे रक्कामाचे आकाडे रुग्णाचे नातेवाईकांना सांगतात. घाबरलेला नातेवाईक काही करून आपला रुग्ण बरा होईल या आशेने देण्यास ही तयार होतो.
ही लुट थांबली पाहिजे. प्रशासनाने मार्फत काही ठराविक रुग्णालयात कोविड सेंटर चालू केले आहे. लॉकडाऊन काळात जेव्हा सर्व जनता कोविड 19 ने घाबरली होती, तेव्हा दोन धार्मिक संस्था यांनी आपली जागा कोरोना रुग्णासाठी देऊ केली, ती म्हणजे अहमदनगर शहराची शान असलेल्या ख्रिश्चन मिशनरीचा बुथ हॉस्पिटल व बाराबाभळी येथील मदरसा.
बुथ हॉस्पिटल हे पहिल्या पासून आरोग्य सेवेत असल्याने आज ही सामान्य जनतेला मोठा दिलासा आहे. सध्या जिल्हा रुग्णालयात ही कोवीड 19 चे रुग्णांची सोय होत आहे. परंतु लॉकडाऊन च्या पाहिल्या काळात जिल्ह्यातील चांगले चांगले खासगी रुग्णालय आणि रुग्णालयात काम करणारे गायब झाले होते.
तेव्हा हेच बुथ हॉस्पिटल लोकांच्या मदतीसाठी ठाम उभे राहिला व आज पण आहे. या निवेदनावर एम.आय.एम. जिल्हा अध्यक्ष -डॉ परवेज अशरफी,जिल्हा महासचिव जावेद शेख, जिल्हा संपर्क प्रमुख कदीर शेख, विद्यार्थी जिल्हा अध्यक्ष शाहनवाज तांबोळी, विद्यार्थी शहर अध्यक्ष- सनाउल्लाह तांबटकर, अमीर खान, आरिफ सय्यद, फिरोज शेख, समीर बेग आदींचे सह्या आहेत.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा
ahmednagarlive24@gmail.com