ग्रामपंचायतीने स्वउत्पनातून गावाची प्रगती केली पाहिजे

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,10 ऑक्टोबर 2020 :-  शहर असो वा गाव विकासासाठी सरकारकडून निधी परंपर होतो व त्यातून विकासात्मक कामे हाती घेतली जातात. मात्र अनेकदा विकासनिधी अभावी विकासकामे खोळंबली जातात.

यासाठी ‘सरकारच्या निधीवर अवलंबून न राहता ग्रामपंचायतीने स्व-उत्पन्नातून गावाची प्रगती केली पाहिजे. लोकांच्या सवयी बदलता आल्या पाहिजेत. ग्रामसेवकांच्या भरवशावर बसू नका.

सरकारच्या हजारो योजनांचे नियोजन करा, त्या योग्य प्रकारे राबवा. जात-धर्मापेक्षा माणसाला किंमत द्या,” असे आवाहन पाटोद्याचे आदर्श सरपंच भास्कर पेरे पाटील यांनी आज येथे केले.

बारामती ऍग्रिकल्चरल डेव्हलपमेंटच्या विश्‍वस्त सुनंदा पवार यांच्या पुढाकारातून सरपंच पेरे पाटील यांचे मार्गदर्शन येथे आयोजित करण्यात आले होते. त्यात ते बोलत होते.

सुनंदा पवार, सरपंच नीलम साळवे, सुवर्णा कानगुडे, शैला थोरात, सारिका जाधव यांच्यासह राशीन परिसरातील महिला, ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पिण्याचे स्वच्छ व शुद्ध पाणी, सौरऊर्जेद्वारे गरम पाणी, मोफत सॅनिटरी पॅड, शेतीसाठी मोफत ट्रॅक्‍टर, कचरा व प्लॅस्टिक संकलन, वर्षभर मोफत दळण,

असे अभिनव उपक्रम आम्ही राबविल्याने ग्रामस्थांचा प्रतिसाद मिळाला. त्यातून करसंकलन वाढले व सुविधांमुळे जनतेचा फायदा झाला, असे त्यांनी सांगितले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24