अहमदनगर Live24 टीम,2 ऑगस्ट 2020 :- शेतकऱ्यांसाठी दूध उत्पादन हा आर्थिक घडी सावरण्यासाठी असणारा उत्तम पर्याय आहे. परंतु मागील काही दिवसांपासून दुधाचे दर घसरल्याने शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला आहे.
त्यामुळे दुधाला किमान ३० रुपये दर मिळावा, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यासाठी दूध उत्पादकांनी एक ऑगस्टपासून आंदोलन सुरु केले आहे.
संगमनेर तालुका भाजपच्या वतीने कोल्हार-घोटी मार्गावर दूध उत्पादकांच्या मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले. यावेळी बोलताना भाजपचे तालुकाध्यक्ष डॉ. अशोक इथापे म्हणाले, कोरोना बरोबरच शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.
दूध धंद्यामुळे असणारी स्थिरता महाआघाडी सरकारच्या उदासिनतेमुळे अस्थिर होत आहे. या धंद्यास या सरकारमुळे घरघर लागली असल्याची टिका त्यांनी केली.
यावेळी दूध उत्पादकांच्या मागण्यांचे निवेदन तहसीलदार अमोल निकम यांना देण्यात आले. याप्रसंगी जनसेवा मंडळाचे अध्यक्ष अॅड. भास्करराव दिघे,
डॉ. विखे पाटील कारखान्याचे संचालक रामभाऊ भुसाळ, संतोष रोहम, डॉ. सोमनाथ कानवडे, रासप नेते नामदेव काशिद, जि. प. सदस्य अॅड. रोहिणी निघुते, राजेश चौधरी,
डॉ. विखे पाटील कृषी परिषदेचे जिल्हाध्यक्ष सचिन शिंदे, शहराध्यक्ष राजेंद्र सांगळे, ज्येष्ठ नेते राम जाजू, भाजप युवा मोर्चा तालुकाध्यक्ष अॅड. श्रीराज डेरे, योगीराजसिंग परदेशी, परिमल देशपांडे, वैभव लांडगे, विठ्ठल शिंदे आंदोलनात सहभागी झाले होते.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा
ahmednagarlive24@gmail.com