अहमदनगर Live24 टीम, 25 नोव्हेंबर 2020 :- सणासुदीच्या काळात नागरिकांनी केलेल्या गर्दीमुळे व वाढणार्या थंडीमुळे करोना रुग्णांचा आलेख सध्या वाढतो आहे.
युरोपियन राष्ट्रांमध्ये करोनाची दुसरी लाट आली असून अनेक देशांमध्ये पुन्हा लॉकडाऊन करण्यात आले आहे. स्वत:ला व स्वत:च्या कुटुंबियांना करोनापासून दूर ठेवण्याकरिता प्रत्येकाने शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करणे अत्यंत गरजेचे आहे.
असे प्रतिपादन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे. तसेच त्यांनी यावेळी कोरोनाची वाढती भीती देखील वर्तवली आहे. महाराष्ट्रात करोना रोखण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने चांगले काम केले असून या काळात नागरिकांचेही मोठे सहकार्य लाभले.
मात्र लॉकडाऊनच्या शिथीलते नंतर व दिवाळी काळात खरेदीसाठी झालेली गर्दी ही मोठी चिंताजनक बाब आहे. करोना संकट अद्याप संपलेले नसून प्रत्येकाने स्वत:ची व स्वत:च्या कुटुंबियांची काळजी घ्यावी, असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.
कोरोनाला रोखण्यासाठी प्रत्येकाने मास्कचा वापर करावा. सोशल डिस्टनचे पालन करावे. वेळोवेळी आपले हात स्वच्छ धुवावे. या त्रिसुत्रीचा वापर करोना रोखण्यासाठी महत्त्वाचा ठरणारा आहे. दरम्यान करोनाच्या दुसर्या लाटेची शक्यता नाकारता येणार नाही,
म्हणून विनाकारण घराबाहेर पडणे टाळा, कुठेही जास्त गर्दी करू नका, काही लक्षणे असल्यास तातडीने जवळच्या वैद्यकीय रुग्णालयांमध्ये तपासणी करून घ्या शासनाच्या नियमांचे पालन करा असे आवाहनही महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved