अहमदनगर बातम्या

महायुतीत धुसफूस ! भाजप नेते उदमले यांचे खासदार लोखंडेवर टिकास्त्र, ‘मुंबईत चालण्याऐवजी शिर्डीत 7 किमी चालले असते तर….’

Published by
Ahmednagarlive24 Office

Shirdi Lok Sabha Election : येत्या काही दिवसात लोकसभा निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात होणार आहे. 19 एप्रिल पासून मतदानाला सुरवात होणार आहे. यामुळे सध्या संपूर्ण राज्यभर राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.

एकीकडे महायुतीमध्ये आणि महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाचा फॉर्मुला अजूनही अंतिम होत नाहीये. दुसरीकडे आता महायुतीमध्ये धुसफूस पाहायला मिळत आहे. खरंतर, अहमदनगर जिल्ह्यातील नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघावर भाजपाने आपला उमेदवार मैदानात उतरवला आहे.

या जागेवरून पुन्हा एकदा विद्यमान खाता डॉक्टर सुजय विखे पाटील यांना तिकीट देण्यात आले आहे. दुसरीकडे शिर्डी लोकसभा मतदारसंघातून महायुतीमध्ये समाविष्ट असलेल्या शिवसेना एकनाथ शिंदे गटाचा उमेदवार उभा राहू शकतो, असे बोलले जात आहे.

मात्र शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे यांच्या विरोधात मतदार संघात मोठी नाराजी पाहायला मिळत आहे. तथापि खासदार सदाशिव लोखंडे यांनी पुन्हा एकदा या जागेवरून निवडणूक लढवण्याची इच्छा बोलून दाखवली आहे.

दुसरीकडे लोखंडे यांच्या विरोधातील नाराजी पाहता भाजपाने या जागेवर दावा ठोकला आहे. ही जागा भाजपाच्या वाटेला जाणार आणि या जागेवरून बीजेपीचे महाराष्ट्र किसान मोर्चाचे उपाध्यक्ष नितीन उदमले यांना तिकीट दिले जाऊ शकते अशा देखील चर्चा पाहायला मिळत आहेत.

दरम्यान नितीन उदमले यांनी खासदार लोखंडे यांच्यावर टीका केली आहे. यामुळे महायुतीमध्ये काहीतरी धुसफूस सुरु आहे, अशा चर्चा आता राजकीय वर्तुळात पाहायला मिळतायेत.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की खासदार लोखंडे यांनी नुकत्याच काही दिवसांपूर्वी असे म्हटले होते की, ‘मी पैलवान गडी आहे, मी रोज सात किलोमीटर चालतो’, असं म्हणत पुन्हा एकदा शिर्डीच्या जागेवर दावा ठोकला आहे.

मात्र या विधानावर महायुती मधूनच खोचक टिका होऊ लागली आहे. नितीन उदमले यांनी लोखंडे हे रोज सात किलोमीटर मुंबईत चालण्याऐवजी शिर्डीत चालले असते तर कदाचित आज मतदारसंघात त्यांच्या विरोधात नाराजी पाहायला मिळाली नसती आणि आज तिकिटासाठी एवढे झगडावे लागले नसते असे म्हटले आहे.

नितीन उदमले यांनी लोखंडे यांच्यावर निशाणा तर साधलाच आहे शिवाय शिर्डी लोकसभा मतदार संघावर भाजपाचा उमेदवार उभा राहणार आणि आपण उमेदवारीसाठी शर्यतीत असल्याचे संकेत दिले आहेत.

त्यामुळे आता शिर्डी लोकसभा मतदारसंघावर एकनाथ शिंदे गटाचा उमेदवार उभा राहतो की भाजपाचा उमेदवार उभा राहतो हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे. तसेच जर ही जागा एकनाथ शिंदे यांच्या गटाला गेली तर या जागेवरून विद्यमान खासदारांना तिकीट मिळणार की उमेदवार बदलणार हे देखील पाहणे विशेष उत्सुकतेचे राहणार आहे.

Ahmednagarlive24 Office