जिल्ह्यातील बिबट्याचा वाढलेला त्रास हा राजकारण्यांनी विरोध केल्यामुळे झालाय – आमदार बबनराव पाचपुते

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 5 नोव्हेंबर 2020 :-अहमदनगर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात बिबट्याचा वाढलेला त्रास हा त्यावेळी मला जिल्ह्यातील राजकारण्यांनी राजकीय हेतूने विरोध केल्याने होत आहे, असा आरोप माजी वनमंत्री व श्रीगोंद्याचे आमदार बबनराव पाचपुते यांनी गुरुवारी येथे केला.

८ वर्षांपूर्वी २०१२ मध्ये मी वनमंत्री असताना श्रीगोंदे तालुक्यातील बेलवंडी येथे बिबट्या रेस्क्यु सेंटर सुरू करण्याचे प्रयत्न केले होते, पण हे काम मी करतो म्हणून त्यावेळी जिल्ह्यातील राजकारण्यांनी मला विरोध केला होता.

त्यामुळे ते रेस्क्यु सेंटर बारगळले. त्याचा परिणाम आता बिबट्याचा उपद्रव भयानक वाढला आहे. त्यावेळी मला विरोध करणारेच त्याला जबाबदार आहेत, असा दावाही पाचपुते यांनी केला.

दरम्यान, निसर्ग संवर्धनासाठी वाघ-सिंह जगले पाहिजे व वाढले पाहिजे, पण नरभक्षक बिबट्यांना मारले पाहिजे, त्यांना दयामाया दाखवता कामा नये, अशीही मागणी त्यांनी आवर्जून केली.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24