कोतकरांच्या पाठीवर ‘त्या’ बड्या नेत्याचा हात…

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,12 ऑक्टोबर 2020 :-स्थायी समिती सभापतिपदाच्या निवडणुकीवेळी कोतकर यांनी ऐनवेळी भाजपमधून राष्ट्रवादीत प्रवेश केला. प्रवेश करताच स्थायी समितीचे सभापतिपद देखील त्यांना मिळाले.

त्यांनतर मात्र दोन्ही पक्ष कोतकर हे आपलेच असलायचा दावा करू लागले. भाजपकडून या संदर्भात कोतकरांना नोटीसही देण्यात आली. मात्र कोतकरांनी यास कोणतेही प्रत्युत्तर दिले नाही.

तसेच भाजपमधून राष्ट्रवादीत गेलेले मनोज कोतकर यांच्या पाठीशी शहराबाहेरील एका बड्या नेत्याचा आशिर्वाद असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याचे धाडस भाजपमध्ये नसल्याची चर्चा आहे.

भाजपने कोतकर यांना नोटीस देण्याची प्रक्रिया केली असली, तरी ती आता केवळ दिखावू ठरते की काय, अशातला प्रकार आहे. कारण कोतकर यांना नोटीस देऊन तीन दिवसात खुलासा करण्याचे सांगितले होते.

कोतकर यांनी पंधरा दिवस उलटले तरीही त्यावर काहीच खुलासा केला नाही. भाजपही अद्याप त्यांचा खुलासा येण्याच्या प्रतिक्षेत आहे.

मात्र त्याचा खुलासा कोतकर करत नाहीत आणि भाजपही शांत असल्याने पक्षातच याबाबत आता उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.

कोतकर यांना शहराबाहेरील एका बड्या नेत्याचा आशिर्वाद असल्यानेच ते निवांत असल्याचे सांगितले जाते. त्यांच्या दबावामुळे भाजप पुढील कारवाई करण्याचे टाळत असल्याची चर्चा आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24