अहमदनगर Live24 टीम, 25 ऑक्टोबर 2021 :- भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर चांगलीच खळबळ उडाली आहे.
त्यामुळेच पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी नगर जिल्ह्यात येणं देखील कमी केले आहे. आता तर ते जिल्ह्याचे पालकमंत्रिपदही सोडत आहेत. त्यामुळे आम्ही त्यांना जिल्ह्यात अडवण्याच्या दिलेल्या इशार्याचेच हे फलीत आहे,’ असा दावा भाजपचे दक्षिण जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांनी केला.
‘आता जर त्यांनी हे पद लवकर सोडलं नाही, तर आम्ही त्यांना पुन्हा नगरला आल्यावर काळे झेंडे दाखवू,’ असा इशारा देखिल मुंडे यांनी दिला आहे. यासंबंधी भाजपचे जिल्हाध्यक्ष मुंडे म्हणाले,
‘सोमय्या यांनी केलेल्या आरोपातून क्लिनचीट मिळेपर्यंत पालकमंत्रिपद सोडा नाही तर जिल्हा दौर्यात त्यांना अडवू असा इशारा आम्ही देऊन आता सुमारे तीन आठवडे झाले आहेत.
या काळात त्यांनी जिल्ह्यात येण्याची हिंमत केली नाही. दोन दिवसांपूर्वी आल्यावरही पालकमंत्रिपद सोडणार असल्याचे स्पष्ट केल्याने आमच्या इशार्याचाच तो परिणाम आहे.
मुश्रीफ नगर जिल्ह्यात काम करूच शकत नाहीत. त्यांची ती मानसिकताही नाही. त्यामुळे त्यांनी तातडीने जिल्ह्याचे पालकमंत्रिपद सोडावे. ते त्यांनी सोडले नाही व ते जिल्ह्यात आले तर आम्ही त्यांना नक्कीच अडवू, काळे झेंडे दाखवू,’ असंही अरूण मुंडे म्हणाले