अहमदनगर बातम्या

सुपा येथील आरोग्य उपकेंद्राला आरोग्य केंद्राचा दर्जा देऊन सुविधा द्याव्यात

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 01 मार्च 2022 :-  पारनेर तालुक्यातील सर्वात मोठे गाव म्हणून सुपा गावची ओळख आहे. नगर-पुणे महामार्गावरील गाव आणि सतत विस्तारित होणारी औद्योगिक वसाहत, सोबत आजूबाजुला शैक्षणिक सुविधा, यामुळे गेल्या काही वर्षात सुपा ग्रामपंचायतीच्या हद्दीत मोठ्या नागरीवस्ती वाढत आहे.

म्हणूनच सुपा येथील आरोग्य उपकेंद्राला आरोग्य केंद्राचा दर्जा देऊन सुविधा द्याव्यात, अशी मागणी सुपा ग्रामस्थांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे.

सध्या सुपा गावात 15 ते 20 हजार नागरिक रहातात. त्या तुलनेत गावात शासकीय आणि खाासगी आरोग्य सुविधा तोकड्या आहेत. तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असूनही याठिकाणी आरोग्य उपक्रेंद्र आहे.

त्यामुळे सुपा गाव व परिसरातील नागरिकांना पुरेशा आरोग्य सुविधा मिळत नाहीत. याबाबत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना परिस्थितीची कल्पना देण्यात आली आहे. यावेळी मंत्री टोपे यांना निवेदन देण्यात आले.

यात सुपा येथे दाट लोकवस्ती आहे. त्या तुलनेत गावात आरोग्य उपकेंद्र असल्याने नागरिकांना शासकीय आरोग्य सुविधा मिळत नाहीत.

यासाठी सुपा येथील आरोग्य उपकेंद्राऐवजी आरोग्य केंद्रच मंजूर करावे, आरोग्य केंद्र उभारणीसाठी निधी द्यावा, अशी मागणी करण्यात आली. मंत्री टोपे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत जागा उपलब्ध करा, मागणीनुसार कार्यवाही करू, असे असे आश्वासन दिले.

Ahmednagarlive24 Office