अहमदनगर Live24 टीम,28 ऑक्टोबर 2020 :- राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी ऑक्टोबर महिन्यात जोरदार पाऊस पडला. बंगालच्या उपसागराच्या पश्चिम मध्य भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने तेलंगणा, आंध्रप्रदेश, कर्नाटक व महाराष्ट्रात अतिवृष्टी झाली. याचा परिणाम अहमदनगर जिह्यावरही मोठ्या प्रमाणात झाला .
या पावसाने जिल्ह्यातील 11 तालुक्यांतील 2 लाख 30 हजार शेतकर्यांचे 156 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. या पावसामुळे 1 लाख 64 हजार क्षेत्रावरील पिकांचे 33 टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आलेल्या
पंचनाम्यात जिल्ह्याच्या जिरायत भागातील 1 लाख 27 हजार शेतकर्यांचे 99 हजार 856 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून यासाठी 67 कोटी 97 लाख रुपयांचे नुकसान झालेले आहे. बागायत भागातील 98 हजार शेतकर्यांचे 61 हजार 566 हेक्टरवरील 83 कोटी रुपयांचे नुकसान झालेले आहे.
तर 2 हजार 735 हेक्टरवरील 3 हजार 881 शेतकर्यांचे सुमारे पाच कोटी रुपयांचे नुकसान झालेले आहे. कांदा, तूर, कापूस सोयाबीन, भाजीपाला, मका फळबागा, झेंडू, चारापिके, ऊस, ज्वारी बाजरी, केळी आणि पपई यांच्या बागा या पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे.
तालुकानिहाय नुकसान पाथर्डी
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved