अहमदनगर Live24 टीम, 8 जानेवारी 2021 :- पंडित नेहरूंच्या पुतळ्याभोवती लावलेले होर्डिंग काढण्याची मागणी करूनही महापालिकेने ते हटवले नाहीत. त्यामुळे काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गुरूवारी मनपात तासभर ठिय्या आंदोलन केले.
जेसीबी आणून १२ जानेवारीला हे फ्लेक्स काढण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी यावेळी दिला. लालटाकी येथील नेहरू पुतळा झाकणारे होर्डिंग काढण्यासाठी सात दिवसांचा अल्टिमेटम विद्यार्थी काँग्रेसने दिला होता.
तथापि, मनपाने दखल घेतली नाही. त्यामुळे काँग्रेसने ‘पंडित नेहरू अमर रहे’चे फलक हातात धरून घोषणाबाजी करण्यात आली. काळे म्हणाले, मनपाने होर्डिंग काढले नाहीत,
तर राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद जयंतीदिनी आम्ही होर्डिंग हटवू. यावेळी उपायुक्त संतोष लांडगे यांनी आंदोलकांची भेट घेऊन होर्डिंग हटवण्याचे आश्वासन दिले. काँग्रेसने त्यांना मागण्यांचे निवेदन देऊन आंदोलन स्थगित केले.