अहमदनगर Live24 टीम ,27 जून 2020 : पारनेर तालुक्यातील सुपा येथे कोरोना बाधित महिलेचा मृत्यू झाल्याने गावातील सर्व व्यवहार दुसऱ्या दिवशीही बंद ठेवण्यात आले. अत्यावश्यक सेवा वगळता बँका, पतसंस्थाही तीन दिवस बंद राहणार आहेत.
तसेच या कोरोना याधित व्यक्तीने उपचार घेतलेले ख्यासगी हॉस्पिटल देखील १४ दिवसांसाठी सील करण्यात आले आहे. आतापर्यंत बाधित व्यक्तीच्या संपर्कातील ३३ व्यक्तींची तपासणी केली आहे.
इतर कोणी संपर्कात आले होते का त्याची शोधमोहीम सुरू असून, पुणे, मुंबईहून यापूर्वी किती तरी व्यक्ती सुप्याच्या या चौकात येऊन भोजन करून मार्गस्थ झाल्या. बाहेरच्या अनेकांना येथे क्वारंटाईन करण्यात आले होते.
परंतु, प्रशासनाने खबरदारी घेऊन संसर्ग होऊ दिला नव्हता. यापूर्वी एमआयडीसीत एक जण पॉझिटिव्ह रूग्ण सापडला होता. आता ही दुसरी व्यक्ती पॉझिटिव्ह सापडली आहे. मात्र ग्रामस्थांनी त्याबाबत न घाबरता त्याला तोंड देण्याची तयारी केली आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews