Ahmednagar News : पती पत्नीला नांदायला चल म्हणाला मात्र तुमच्या सोबत नांदायला येणार नाही, असे म्हणताच राग आल्याने पतीने या रागाच्या भरात आधी पत्नीच्या गळ्यावर चाकूने वार करून तिला गंभीर जखमी केले. त्यानंतर पतीने स्वतःच्या देखील गळ्यावर चाकूने वार करून घेतले. यात दोघेही गंभीर झाले आहेत ही घटना कोपरगाव तालुक्यातील चासनळी येथे गुरुवारी (दि. ११) रात्री सव्वाअकराच्या सुमारास घडली. संगिता सुभाष सोनवणे (वय २२)व सुभाष हिरामण सोनवणे असे या घटनेत जखमी झालेल्या पतिपत्नीचे नाव आहे.
या प्रकरणी जखमी महिलेचे मामा अण्णा वामन बर्डे (वय ५५, रा चासनळी, ता. कोपरगाव) यांनी शुक्रवारी (दि. १२) रात्री उशिरा कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून, पोलिसांनी सुभाष हिरामण सोनवणे (रा. सोयेगाव, ता. नांदगाव, जि. नाशिक) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, जखमी संगिता सुभाष सोनवणे (वय २२) हीचे लग्न नांदगाव तालुक्यातील सोयेगाव येथील सुभाष हिरामण सोनवणे यांच्यासोबत झालेले आहे. परंतू संगिता सद्या चासनळी येथे मामा अण्णा वामण बर्डे यांच्या घरी राहाते.
दरम्यान अण्णा बर्डे यांचा मुलगा रामा बर्डे यांचे मंगळवारी (दि. ९) लग्न होते. त्या लग्नासाठी भाची संगीता सोनवणे सोमवारी (दि. ८) चासनळी येथे आली होती. लग्नाच्या दिवशी तिचा पती सुभाष हिरामण सोनवणे हा देखील लग्नाला आला होता.
लग्न झाल्यानंतर दोघे पती-पत्नी बर्डे यांच्या घरी आले व पुढील दोन दिवस होती. मुक्कामी राहिले. गुरुवारी (दि. ११) सकाळी सुभाष हा त्याच्या गावी निघून गेला.त्यानंतर त्याच दिवशी रात्री साडेनऊच्या सुमारास परत चासनळी येथे आला. रात्री सव्वा अकराच्या सुमारास पती पत्नीत घरी जाण्यावरून वाद सुरू होता.
तो पत्नीला सासरी चल म्हणाला , त्यावर तीने सासरी जाण्यास नकार दिला.तेव्हा रागाच्या भरात सुभाषने दमदाटी करून पत्नीच्या गळ्यावर कांदा कापण्याच्या चाकूने वार केले.
त्यामुळे संगीताचा मोठ्याने ओरडल्याचा आवाज आला. त्या वेळी बर्डे घराबाहेर आले असता संगीताच्या गळ्याला जखम झाल्याने बेशुद्ध होऊन रक्तबंबाळ झाली होती.
त्यानंतर सुभाष याने त्याच्या हातातील चाकू स्वतःच्या गळ्यावर मारून घेतला व लगेच फेकून दिला. त्यानंतर जखमी संगीतास चासनळी येथील सरकारी दवाखान्यात प्राथमिक उपचार करून कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तिच्या गळ्याला दहा ते अकरा टाके पडले आहेत. तसेच हल्लेखोर पती सुभाष याच्या गळ्यालाही जखम झालेली आहे.
या प्रकरणी जखमी महिलेचे मामा अण्णा वामन बर्डे (वय ५५, रा चासनळी, ता. कोपरगाव) यांनी शुक्रवारी (दि. १२) रात्री उशिरा कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून, पोलिसांनी सुभाष हिरामण सोनवणे (रा. सोयेगाव, ता. नांदगाव, जि. नाशिक) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.