पतीने चोरून दुसरे लग्न केले ; पत्नीच्या तक्रारीवरून 10 जणांवर गुन्हा

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,5 ऑक्टोबर 2020 :- चोरून दुसरे लग्न केल्याने संतप्त झालेल्या पहिल्या पत्नीने पतीसह नऊ जणांविरुद्ध गुन्हा तक्रार दिली आहे. त्यांच्या विरोधात नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेवासा तालुक्यातील हंडीनिमगाव येथे सदर घटना घडली. उषा संदीप कुर्‍हाडे (वय 33) हल्ली रा.फुलारी वस्ती भेंडा बुद्रुक असे या तक्रार दिलेल्या विवाहितेचे नाव आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार 27 मार्च 2005 रोजी त्यांचे लग्न झाले होते.

2011 पासून माझे सासरचे लोक मला त्रास देऊ लागले. 11 डिसेंबर 2011 रोजी मी प्लाट घेण्यासाठी 5 लाख रुपये माहेरून आणावेत या कारणाकरिता त्यांनी मला घराबाहेर काढून दिले.

त्यावर माझ्या वडिलांनी उसने पासणे करून 2 लाख रुपये आणून दिले व समजावून सांगितले की यापुढे पैसे देण्याची माझी ऐपत नाही.

ते वारंवार पैशाच्या कारणावरून मला शारीरिक व मानसिक त्रास देऊन वेळोवेळी उपाशीपोटी ठेऊन घराबाहेर काढून देत होते. जून 2020 मध्ये माझा भाऊ नितीन यास समजले

की माझा नवरा संदीप याने मी हयात असतानासुद्धा माझी कुठलीही पूर्व परवानगी न घेता जून महिन्यात करजगाव, ता. चाळीसगाव, जि.जळगाव येथील नानासाहेब राजाराम गायकवाड यांची मुलगी शीतल हिच्याशी परस्पर लग्न करून हंडीनिमगाव येथे आणले आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24