Ahmednagar News : पतीला दुसऱ्या महिलेसोबत नको त्या अवस्थेत पकडले, पतीसह त्या महिलेच्या नातेवाईकांनी पत्नीलाच जबर मारले

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : समाजात कधी काय घडेल याचा आता नेम राहिला नाही. नीतिमूल्य पायदळी तुडवली जात असल्याच्या अनेक घटना याआधीही समोर आलेल्या आहेत. आता आणखी एका वृत्ताने खळबळ उडाली आहे.

बंद खोलीत पतीला दुसऱ्या एका महिलेसोबत नको त्या अवस्थेत पत्नीने पाहिले, याचा राग आल्याने पत्नीलाच पतीने व त्या महिलेच्या नातेवाईकांच्या मदतीने पत्नीला मारहाण केली. यात ती पत्नी गंभीर जखमी झाले आहे. तिच्यावर सध्या खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

जखमी पीडितेने उपचारादरम्यान तोफखाना पोलिसांना दिलेल्या जबाबावरून आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हा दाखल झालेल्यामध्ये फिर्यादीच्या पतीसह त्याच्यासोबत पकडलेली महिला व तिच्या नातेवाईकांचा समावेश आहे. फिर्यादी या त्यांच्या पती व तीन मुलांसह नगर शहरात राहतात. त्यांनी सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास त्यांच्या पतीला दुसऱ्या एका महिलेसोबत बंद खोलीमध्ये नको त्या अवस्थेत पकडले.

त्याचा राग मनात धरून त्या महिलेने तिच्या नातेवाईकांना बोलवून घेतले. नातेवाईकही घटनास्थळी आले व त्यांनी फिर्यादील पत्नीला लोखंडी गजाने मारहाण केली. आता या मारहाण करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.