अवैध उत्खनन करणारी कंपनी नागरिकांच्या आक्रमकतेमुळे आली अडचणीत

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,11 ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून अवैध उत्खनन होण्याचे प्रमाण वाढले आहे. जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये उत्तखनाचे वाढते प्रकार आता प्रशासनाबरोबरच नागरिकांना देखील त्रासदायक ठरत आहे.

यामुळेच नागरिकांच्या आक्रमकतेमुळे एका अवैध उत्खनन करणारी कंपनी चांगलीच अडचणीत आली आहे. संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे परिसरातील हसनाबाद येथे नागपूर-मुंबई या समृद्धी महामार्गाचे काम करणारी ‘गायत्री’ प्रोजेक्टस लिमिटेड कंपनी दगडखाणीतून मोठ्या प्रमाणात उत्खनन करत आहे.

यासाठी मोठमोठे स्फोट करत आहे. यामुळे आजूबाजूच्या रहिवाशांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. याबाबत ग्रामस्थांनी जिल्हा प्रशासनाकडे त्वरीत हे बेकायदेशीर उत्खनन बंद करण्याची मागणी निवेदनातून केली आहे. मात्र, कोणतीही उचित कार्यवाही न झाल्याने रहिवाशांनी थेट राष्ट्रीय हरित लवादाकडे धाव घेतली.

दरम्यान, 8 ऑक्टोबर, 2020 रोजी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी होऊन अवैध उत्खनन प्रकरणी जिल्हाधिकारी आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला चौकशी समिती स्थापन करण्याचे राष्ट्रीय हरित लवादाने आदेश देत सहा आठवड्यात न्यायालयास अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.

सदर उत्खननासाठी स्थानिक ग्रामपंचायतने कुठलाही ना हरकत दाखल दिला नसल्याचे माहिती अधिकारातून उघड झाले आहे. तसेच जिल्हा खनीकर्म अधिकारी कार्यालयाकडूनही परवानगी मिळाली नसल्याचेही स्पष्ट झाले आहे.

दरम्यान अवैध उत्खनन प्रकरणी जिल्हाधिकारी आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला चौकशी समिती स्थापन करण्याचे राष्ट्रीय हरित लवादाने आदेश देत सहा आठवड्यात न्यायालयास अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. हा गायत्री कंपनीस मोठा दणका मानला जात आहे. आता जिल्हा प्रशासन काय भूमिका घेते याकडे रहिवाशांचे लक्ष लागून आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24