Ahmednagar News : आगामी लोकसभा निवडणूक जवळ येऊन ठेपली आहे. त्या अनुशंघाने प्रशासन देखील कामाला लागले आहे. आता पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत. आता महसूल विभागात देखील खांदेपालट लवकरच होईल.
दरम्यान पोलीस प्रशासनातील पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्या व नेमणुका मंगळवारी (दि.१६) करण्यात आल्या. यामध्ये २४ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबतचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी काढले असून यात १७ पोलीस निरीक्षक व सात सहायक पोलीस निरीक्षक आदींचा सहभाग आहे.
मंगळवारी पोलीस अधीक्षक ओला यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा पोलीस आस्थापना मंडळाच्या पार पडलेल्या बैठकीत बदल्यांबाबत निर्णय घेण्यात आला. यामध्ये नगर शहरातील कोतवाली, तोफखाना, एमआयडीसी, भिंगार कॅम्प यांच्यासह श्रीरामपूर शहर, राहुरी,
आश्वी, शनिशिंगणापूर, अकोले, कोपरगाव तालुका, शिर्डी, सोनई, राहाता, लोणी, पारनेर, सुपा, राजूर, बेलवंडी या पोलीस ठाण्याला नवीन प्रभारी अधिकारी मिळाले आहेत. आता कोठे कोणत्या अधिकाऱ्याची बदली झाली, कोठे कोणता अधिकारी मिळाला ते आपण पाहुयात –
बदली झालेले पोलीस अधिकारी (कंसात सध्याचे नेमणुकीचे ठिकाण व त्यापुढे नवीन नेमणुकीचे ठिकाण)
पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड (पारनेर ते आर्थिक गुन्हे शाखा), ज्योती गडकरी (सुपा ते नियंत्रण कक्ष), विजय करे (अकोले ते जिल्हा विशेष शाखा), प्रताप दराडे (जिल्हा विशेष शाखा ते कोतवाली), अरूण आव्हाड (आर्थिक गुन्हे शाखा ते सुपा),
संजय ठेंगे (बेलबंडी ते राहुरी), संजय सोनवणे (राहुरी ते आश्वी), अशोक भवड (मानवसंसाधन ते शनिशिंगणापूर), संतोष भंडारे (आश्वी ते बेलवंडी), गुलाबराव पाटील (वाहतूक शाखा शिडीं, ते अकोले), नितीनकुमार चव्हाण (नियंत्रण कक्ष ते वाचक पोलीस निरीक्षक, पोलीस अधीक्षक कार्यालय),
आनंद कोकरे (नव्याने हजर ते तोफखाना), नितीन देशमुख (नव्याने हजर ते श्रीरामपूर शहर), सतीष घोटेकर (नव्याने हजर ते मानवसंसाधन), समिर बारावकर (बदली आदेशाधीन ते पारनेर), संदीप कोळी (बदली आदेशाधीन ते कोपरगाव तालुका), रामकृष्ण कुंभार (बदली आदेशाधीन ते शिर्डी),
सहा.पोलीस निरीक्षक योगेश राजगुरू (पाथर्डी ते भिंगार कॅम्प), माणिक चौधरी (सोनई ते एमआयडीसी), आशिष शेळके (शेवगाव ते सोनई), कैलास वाघ (राहाता ते लोणी), युवराज आठरे (लोणी ते सायबर), दीपक सरोदे (शेवगाव ते राजुर), रामचंद्र करपे (सोनई ते भरोसा सेल)