अहमदनगर Live24 ,22 जून 2020 : कोपरगाव तालुक्यात पुन्हा एकदा कोरोनाने उचल खाल्ली. संजयनगर भागात एका नगरसेवकासह ६ जण, तर करंजी ग्रामपंचायत हद्दीतील या रुग्णांच्या संपर्कात आलेले १० जण अशा १६ जणांची विलगीकरण कक्षात रवानगी करण्यात आली.
२० जूनला करंजी ग्रामपंचायत हद्दीतील मात्र येवले व वैजापूर आदी ठिकाणी भाजीपाला विक्री करणारे शेतकरी कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले.
त्यांच्या संपर्कात आलेला चांदवड येथे नोकरी करत असलेला मुलगा घरी आल्याने तोही बाधित असल्याचे नाशिक जिल्ह्याच्या यादीत निष्पन्न झाले. त्यामुळे प्रशासनाने तातडीने करंजी गावात प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews