या तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला; एकच दिवसात वाढले एवढे रुग्ण

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 13 नोव्हेंबर 2020 :-शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा फैलावत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. गावपातळीवर कोरोनाचे संक्रमण वाढले असल्याने कोरोनाबाधितांची आकडेवारीत वाढ होत आहे.

त्यातच जिल्ह्यातील अकोले तालुक्यात कोरोनाने पुन्हा एकदा वेग घेतल्याच्या दिसून येत आहे. अकोले तालुक्यात कोरोनाचा कहर काही थांबायचे नाव घेत नाही. तर लोक देखील काही जबाबदारीने वागायला तयार नाहीत. त्यामुळे येथील कोरोनाची आकडेवारी मोठी वाढती दिसते आहे.

अकोल्यात दरदिवशी अर्धशकतकाच्या जवळची आकडेवारी पहायला मिळत आहे. अकोले तालुक्यात आज करोनाने विस्फोटक वृत्ती धारण केली आहे. तालुक्यात आज तब्बल ५४ बाधित आढळून आले आहेत. तालुक्याची एकूण बाधितांची संख्या २५३१ वर पोहोचली आहे.

दरम्यान ऐन सणासुदीच्या काळात वाढती कोरोनाबाधितांची आकडेवारी तालुक्यासाठी चिंताजनक बनत आहे. दरम्यान कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता प्रशासनाने आधीच वर्तवली आहे. यामुळे नागरिकांनी शासनाने घालून दिलेले नियमांचे पालन करावे असे प्रशासनाकडून वारंवार आवाहन करण्यात आले आहे .

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24