अहमदनगर Live24 टीम, 24 ऑक्टोबर 2021 :- गेल्या काही दिवसांपासून शिर्डी येथील नवीन विश्वस्त मंडळ हे चांगलेच चर्चेत राहिले आहे. सध्या हेच मंडळ न्यायालयाच्या फेऱ्यांमध्ये अडकले आहे.
मात्र आता एक दिलासादायक माहिती समोर येत आहे. न्यायालयाच्या फेर्यात अडकलेल्या शिर्डी विश्वस्तांचा अपुर्ण कोरम दिवाळीपूर्वी पूर्ण केला जाईल. शिवसेनेच्या कोट्यातील रिक्त जागांवर विश्वस्तांची नियुक्ती केली जाणार असून याबाबतच्या हालचाली शासन दरबारी सुरू आहेत.
अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे तर उपाध्यक्षपद शिवसेनेकडे… शिर्डीच्या साईबाबा संस्थानचे अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे तर उपाध्यक्षपद शिवसेनेकडे आहे.
महाविकास आघाडी सरकारने राष्ट्रवादीने 11 विश्वस्तांच्या नियुक्ती करताना राष्ट्रवादीचे आ. अशुतोष काळे यांना अध्यक्ष केले आहे. मात्र, 5 जागा अजूनही रिक्त आहेत.
शिवसेनेने मुंबईतील दोघांची नियुक्ती केली, तसेच नवीन विश्वस्त नियुक्ती करतांना कोणत्या प्रवर्गातून कोण याची माहिती दिली नाही.त्यामुळे उत्तमराव शेळके यांनी खंडपीठात याचिका दाखल केली.
त्यावर 28 ऑक्टोबर रोजी सुनावणी आहे. दरम्यान या सुनावणीपूर्वीच सरकारकडून शिर्डीत संस्थानच्या विश्वस्तांचा कोरम पूर्ण केला जाणार आहे. शिवसेना तीन विश्वस्त नियुक्त करणार असून त्यात कोणाला संधी मिळणार याकडे सर्वाचे लक्ष लागून आहे.