अहमदनगर Live24 टीम,27 जुलै 2020 :- सध्या शेती जर कल्पकतेने केली तर उत्पादनच चांगला सोर्स तयार होऊ शकतो. शेतीसाठी येणारा उत्पादन खर्च आणि मजुरांना जर पर्यायी व्यवस्था उभी राहिली तर नक्कीच शेतीमधील प्रॉफेट वाढवता युयु शकते.
हेच अंगीकारून नेवासा तालुक्यातील भेंडा येथील दोघा तरुण शेतकऱ्यांनी अल्प खर्चात ‘तूर पीक शेंडे खुडणी यंत्र’ तयार केले आहे.
राम गरड व स्वराज असे या शेतकऱ्यांचे नाव आहे परंतु कोरोना मुळे दोघेही घरीच असल्याने काहीतरी वेगळे व चांगले शेतकरी हिताचे करण्याचा निर्णय घेऊन त्यांनी ‘तूर शेंडे कापणी यंत्र’ तयार करण्याचा निर्णय घेतला.
त्यासाठी लहान विद्युत मोटार, पाते, पीव्हीसीपाईप, वायर असे साहित्य खरेदी केले. घरच्याच औषध फवारणी पंपाचा वापर केला. यंत्र तयार करताना येणार्या अडचणी व सुधारणा करण्यास दोन दिवस लागले.
एकुण 600 रुपयापर्यंत खर्च या यंत्रासाठी आला. या यंत्राच्या साह्याने एका दिवसात एक व्यक्ती किमान दोन एकरातील तुरीचे शेंडे खुडणी करु शकतो.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा
ahmednagarlive24@gmail.com