अहमदनगर Live24 टीम, 22 डिसेंबर 2020 :-जिल्ह्यासह संगमनेर शहरात गुन्हेगारी वाढल्याच्या दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये लूटमार, घरफोडी, जबरी चोरी आणि वाहन आदी घटनांमध्ये वाढ झाली आहे.
धक्कादायक बाब म्हणजे शहरात तब्बल 60 मोटार वाहनांची चोरी झाली असून 18 घरफोड्या झाल्या आहेत. या गुन्ह्यांचा तपास लावण्यात पोलीस यंत्रणेला मात्र अपयश आले आहे.
संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सरत्या वर्षात मोटारसायकलच्या चोर्या वाढल्याचे दिसून येत आहे. मोटारसायकली व इतर वाहनांच्या जवळपास 60 चोर्या झाल्या आहेत.
अनेक नागरिकांनी पाठपुरावा करुनही त्यांची वाहने मात्र सापडू शकली नाही. पोलिसांच्या या निराशाजनक कामगिरीमुळे पोलिसांच्या कामाबाबत आता सर्वसामान्य नागरिकांच्या मनात शंका उपस्थित होऊ लागल्या आहेत.
तसेच शहर व परिसरात तीन गंठण चोर्या झाल्या आहे. अनेक चोर्यांचे पोलिसांनी गुन्हेही दाखल केलेले नाहीत. अनेक महिलांनी पोलीस ठाण्यात वारंवार चकरा मारुनही त्यांचे दागिने परत मिळालेले नाही.
मागच्या वर्षाच्या तुलनेत या वर्षात गुन्हेगारीत वाढ झाली आहे. पोलीस अधिकार्यांच्या होणार्या बदल्या. पोलिसांवर अधिकार्यांचा वचक नसणे याचा परिणाम गुन्हेगारी वाढण्यात झाला आहे.