अहमदनगर Live24 टीम,30 जुलै 2020 :- अहमदनगर शहरात वाढत्या कोरोना संसर्गाच्या रुग्णांसाठी आणि त्यांच्या संपर्कात आलेल्यांना क्वारंटाईन करण्यासाठी बेडचा अभाव निर्माण झाला आहे.
महापालिकेच्या आजच्या ऑनलाईन सभेत या मुद्यांवर चांगलीच चर्चा झाली. महापालिका प्रशासनाकडून रुग्णांना ठेवण्यासाठी दसरेनगर,
शासकीय तंत्रनिकेत आणि हॉटेल नटराज येथे कोविड सेंटर सुरू करणार असल्याची माहिती या सभेत दिली. नगर शहरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहेत.
रुग्णसंख्या वाढत असल्याने त्यांना वेळीच क्वारंटाईन करण्यात येत नाही. रुग्णांना वेळीच उपचारासाठी दाखल गेले जात नाही. काही रुग्ण पॉझिटिव्ह असताना फिरतात, असे प्रकार घडले आहेत.
या मुद्यांवर महापालिकेच्या सभेत चर्चा झाली. महापौर बाबासाहेब वाकळे, आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी चर्चेची दखल घेत कोविड सेंटर
वाढविणार असल्याची माहिती दिली. दसरेनगर, शासकीय तंत्रनिकेत आणि हॉटेल नटराज येथे कोविड सेंटर सुरू करणार असल्याची माहिती या सभेत देण्यात आली.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा
ahmednagarlive24@gmail.com