अहमदनगर Live24 टीम,14 ऑगस्ट 2020 :- कधीही मदतीला धावून जाणारे अनिलभैय्या राठोड हे अजोड लोकनेते होते, असे प्रतिपादन अहमदनगर जिल्हा वाचनालयाचे अध्यक्ष प्रा.शिरिष मोडक यांनी केले.
जिल्हा वाचनालयाच्यावतीने वाचनालयात शिवसेनेचे उपनेते अनिलभैय्या राठोड यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी वाचनालयाच्या उपाध्यक्षा शिल्पा रसाळ, अजित रेखी, संचालक दिलीप पांढरे, प्रा.सौ.ज्योती कुलकर्णी, किरण आगरवाल, गणेश अष्टेकर,
ग्रंथपाल अमोल इथापे, नितीन भारताल, कर्मचारी वृंद उपस्थित होते. प्रा.मोडक म्हणाले की, राठोड हे वाचनालयाचे मोठे आधारस्तंभ होते. ते या जगात नाहीत, यावर अजूनही विश्वास बसत नाही. शिल्पा रसाळ म्हणाल्या की, कोणताही भेदाभेद न मानणारा सर्वसामान्यांच्या हाकेला ओ देवून त्यांची कामे करणारा लोकनेता हरपला.
श्री.अजित रेखी म्हणाले की, अनिल राठोड आणि माझी मैत्री होती. मित्र निघून जाण्याचे दु:ख न पचणारे आहे. मैत्रीला जागणारा नेता म्हणजे अनिल राठोड होते. प्रा.ज्योती कुलकर्णी म्हणाल्या की, सर्वसामान्यांना अजूनही अनिलभैय्या या विश्वात नाहीत,
यावर विश्वास बसत नाही. एक पाठीराखा हरपला. श्री.दिलीप पांढरे म्हणाले की, भैय्यांचे प्रेम मला वैयक्तिकरित्या लाभले. त्यांना वाचनाची आवड होती. वाचनातूनच त्यांचा व माझा स्नेह निर्माण झाला. श्री.गणेश अष्टेकर म्हणाले की, पहिल्या आमदारकीच्या निवडणुकीपासून माझा व भैय्यांचा स्नेह होता.
रात्र न् रात्र गप्पा मारणे हा आमचा छंद होता. त्यांच्या आयुष्यातील चढ-उतारांचा मी साक्षीदार होतो. असा नेता निर्माण होणे नाही. किरण आगरवाल यांनीही अनिल राठोड यांच्याबद्दलच्या आठवणी नमूद केल्या.
ग्रंथपाल अमोल इथापे यांनी वाचनालय व अनिल राठोड यांच्यावतील स्नेहबंध सांगितला. यावेळी प्रा.एन.बी.मिसाळ, आर्किटेक्ट अशोक काळे, स्व.बोथरा यांनाही श्रद्धांजली वाहण्यात आली
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved