बिबट्याने तरुणावर केला प्राणघातक हल्ला… पहा कोठे घडली घटना

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,26 सप्टेंबर 2020 :- जिल्ह्यातील उत्तरेकडे नेहमी बिबट्याचा वावर हा मोठ्या प्रमाणावर आढळून आला आहे. दरम्यान आज पारनेर मध्ये एका युवकावर बिबट्याने हल्ला केला आहे.

या घटनेमध्ये हा युवक थोडक्यात बचावला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी कि, पारनेर तालुक्यातील मुंगशी येथे प्रवीण मारुती करपे (वय -22 वर्ष) हा तरुण आपल्या घराच्या समोर असणाऱ्या छपरा मध्ये झोपलेला असताना

बिबट्याने त्याच्यावर अचानक हल्ला केला. बिबट्याने प्रवीणच्या त्याच्या डोळ्याला व डोक्याला बिबट्याने पंजा मारल्याने जखमा झाल्या आहेत बिबट्याने हल्ला केल्यानंतर तरुणाने आरडाओरडा केल्यानंतर बिबट्या आवाज ऐकून पळून गेला.

या हल्ल्यामध्ये तरुण जखमी झाला असून त्याच्यावर पारनेर येथील ओंकार हॉस्पिटल मध्ये उपचार घेण्यात आले आहेत. बिबट्याने तरुणावर हल्ला केल्यामुळे परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे.

ग्रामस्थांनी वनविभागाला याबाबतची माहिती कळवली त्यानंतर त्वरित वनपरिक्षेत्र अधिकारी पथक घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी या भागांमध्ये पाहणी केली. तसेच परिसरामध्ये बिबट्याचा वावर असल्याचे काही ठसे आढळले आहे

अशी माहिती त्यांनी दिली. दरम्यान या परिसरामध्ये काही दिवसांपूर्वी तीन ते चार कुत्रे बिबट्याने नेले असल्याची माहिती समोर येत आहे.दरम्यान या भागांमध्ये पिंजरा लावावा अशी मागणी ग्रामस्थांनी वन विभागाकडे केली आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24