अहमदनगर Live24 टीम, 17 जानेवारी 2021 :- मागील काही दिवसांपासून शांत बसलेल्या बिबट्याने परत एकदा हल्ले सुरू केले आहेत.
नुकतेच नगर तालुक्यातील जेऊर येथे बिबट्यााचे वास्तव्य दिसून आले असून या बिबट्याने धुरकुंड परिसरात शेळीची शिकार केल्याचे समोर आले आहे.
चापेवाडी शिवारातील मेर परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचे वास्तव्य असून मागील महिन्यात याच परिसरात दादासाहेब काळे यांच्या कुत्र्याची शिकार करण्यात आली होती.
आता गणेश नंदू शेटे यांच्या शेळीची शिकार करण्यात आल्याने परिसरात भीतीचे पवातावरण तयार झाले आहे. चापेवाडी परिसरातील डोंगररांगांमध्ये जनावरे चारण्यासाठी लहान मुले तसेच वृद्ध जात असतात.
शेळीची शिकार बिबट्या कडूनच करण्यात आली असल्याचा अहवाल वन विभागाकडून देण्यात आला आहे. त्यामुळे आता परत नागरिकांसह पाळीव जनावरांवर बिबट्याचे संकट उभे ठाकले आहे.