अहमदनगर Live24 टीम, 02 डिसेंबर 2020 :- जिल्ह्यात गेल्या काही दिवसांमध्ये बिबट्याने अनेकांवर हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत. यातच बिबट्याने पुन्हा एकदा धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. बिबट्याच्या हल्ल्यात काहींना आपला जीव गमवावा लागला आहे.
तर काही ठिकाणी हल्ल्यात मोठ्या प्रमाणात जखमी झाले आहे .असाच एक हल्ला संगमनेर तालुक्यातील आश्वी येथे झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, संगमनेर तालुक्यातील आश्वी येथील उस तोडणी मजूर सचिन मदन राठोड (वय २२) व त्याचे दोन सहकारी मोटारसायकलवर आश्वीकडे येत होते.
दत्त मंदिर परिसरात भक्ष्याच्या शोधात रस्त्यालगत दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक मोटारसायकलवर झेप घेतली. यावेळी दोघे सावध असल्यामुळे बिबट्याचा हल्ला परतवून लावला. यात मदन राठोड यांच्या पायावर बिबट्याने पंजा मारल्यामुळे जखम झाली आहे.
यावेळी राठोड व त्यांच्या सहकार्यांनी आरडाओरड केल्याने बिबट्याने तेथून धूम ठोकली. हल्ल्यामुळे परिसरातील नागरिकांकडून पिंजरा लावण्याची मागणी केली जात आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून भितीचे वातावरण निर्माण आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved