दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक मुलाच्या अंगावर घेतली झेप

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2021 :-  संगमनेर ते कोल्हेवाडी जाणाऱ्या रस्त्यावर उसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक मोटर सायकल स्वरांवर झेप घेऊन ओम फकीरा मंडेला (वय १३ रा. वडाळा, नाशिक) या शाळकरी मुलाच्या पायाला तळपायाला आणि मांडीला चावा घेत गंभीररित्या जखमी केल्याची घटना रविवारी पहाटेच्या सुमारास घडली या बाबत समजलेली अधिक माहिती अशी की संगमनेर तालुक्यातील समनापुर येथील सूर्यकांत जेडगुले हे आणि त्यांच्याकडे पाहुणा म्हणून आलेला तरुण ओमफकेरा मंडेला रा नाशिक हे दोघेजण मोटरसायकलवर वांगी घेऊन संगमनेरला कोल्हेवाडी ते संगमनेर रोड ने संगमनेरला वांगी विकण्यासाठी जात होते.

यावेळी अचानक उसाच्या शेतातून आलेल्या बिबट्याने त्यांच्या मोटरसायकलवर हल्ला चढविला असता तेदोघेही खाली पडले असता व बिबट्याने रवी मंडले याच्या पायाला चावा घेत त्यास गंभीररीत्या जखमी केले

बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या त्या दोघांनाही परीसरातील नागरिकांनी तात्काळ डॉ प्रदीप कुटे यांच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे त्या दोघांवरही हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू आहे.

जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात बिबटे असल्यामुळे या बिबट्यांचा वनविभागाने त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24