अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2021 :-जिल्ह्यात बिबट्याची दहशत काही केल्या कमी होताना दिसत नाहीये. दरम्यान अनेकदा बिबट्या शिकारीच्या शोधात असताना मृत झालेला आहे.
असाच काहीसा प्रकार श्रीरामपूर तालुक्यात घडला आहे. श्रीरामपूर तालुक्यातील पढेगाव परिसरातील मातापूर रेल्वे चौकी येथे दीड वर्षे वयाच्या मादी बिबट्याचा अनैसर्गीक मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी वनरक्षक विकास पवार, रेल्वे सुरक्षा बलाचे शाम केवट, मातापूरचे पशु संवर्धन अधिकारी डॉ. अविनाश ठाकुर ,
पढेगावचे डॉ. विजय शिरशे यांनी घटनास्थळी पंचनामा केला. बेलापूरचे पशु वैद्यकीय अधिकारी डॉ धुमाळ यांनी शवविच्छेदन केले आहे.