अहमदनगर Live24 टीम, 12 डिसेंबर 2021 :- आदर्श कार्यपद्धतीनुसार राज्य शासनाच्या 23 निकषाच्या आधारे घरकुलांच्या यादीची तपासणी होणार आहे. त्यानुसार गावातील सर्वेक्षणासाठी कामगार तलाठी,
कृषी सहाय्यक व सहकारी सोसायटी सचिव या तीन सदस्यांची समिती नियुक्त करण्यात आली आहे. सदर समितीचे सदस्य प्रत्यक्ष भेट देऊन माहिती संकलन करीत आहेत.
त्यामुळे नागरिकांनी समितीला माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान श्रीरामपूर तालुका पंचायत समितीच्यावतीने 52 ग्रामपंचायतीमधील 11 हजार 709 कुटुंबाच्या घरकुलांसाठी लाभार्थीं प्रतीक्षा यादीकरिता सर्वेक्षण करण्यात येत आहे.
नागरिकांनी ग्रामस्तरीय समितीस माहिती देऊन या योजनेचा लाभ घ्यावा, असेे आवाहन पंचायत समितीच्या सभापती डॉ. वंदना ज्ञानेश्वर मुरकुटे यांनी केले आहे. घरकुलांसाठी अपात्र लाभार्थीमधून या सर्वेक्षणाद्वारे पात्र लाभार्थींची निवड केली जाणार आहे.
काय आहेत शासनाचे निकष? जाणून घ्या
लाभार्थीकडे दुचाकी अथवा चारचाकी वाहन नसावे,
किसान क्रेडीट कार्ड व पक्के घर नसावे,
दहा हजारांपेक्षा जास्त उत्पन्न नसावे
यापूर्वी घरकुलाचा लाभ घेतला नसावा,
अडीच एकर बागायती किंवा साडे सात एकर जिरायती पेक्षा जादा जमीन नसावी